Ajit Pawar: अजित पवारांच्या मेळाव्यात अमोल कोल्हेंचा फोटो; राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या, पाहा व्हिडिओ
Amol Kolhes Photo on Ajit Pawars Banner: अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला आहे, यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेले तर काही जण शरद पवारांच्या सोबत थांबले, मात्र अधून मधून एखादा आमदार, खासदार या ना त्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असते, त्यावरती अनेकदा स्पष्टीकरणंही समोर येतात. असं असतानाच आता चक्क अजित पवारांच्या एका कार्यक्रमातील बॅनरवरती खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा फोटो लागल्याने चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला आहे, यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. अमोल कोल्हेंच्या फोटो लगतच शिवाजी आढळरावांचा ही फोटो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार खेड विधानसभा मतदार संघात आज विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. यावेळी अजित पवार कडूस येथे ते शेतकरी मेळावा घेणार आहेत. तत्पूर्वी या मेळाव्याच्या बॅनरवरती अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा फोटो दिसल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.
अजित पवारांच्या मेळाव्यात अमोल कोल्हेचा फोटो, तर्क-वितर्काना उधाण#ajitpawar #amolkolhe #NCP pic.twitter.com/kxDGwsMe62
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 12, 2024
तत्पर अजितदादा भूमिपुजनाला बुट काढायला विसरले?
ऐरवी जे आपल्या वागण्याच्या माध्यमातून आपल्या तत्परतेतून आपलं लक्ष वेधून घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच चर्चेत असतात. आजही ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या एका कृतीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. चाकण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या पायातील शुज (बुट) पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमीपूजन केलं. ऐरवी एखाद्या छोट्या चुकीमुळे सर्वांना फैलावर घेणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) मात्र नारळ फोडताना भुमिपूजनाचा टिकाव मारताना बुट काढण्याचा विसर पडला असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ
भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका, अस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.तसेच दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन देखील दिले. अजित पवार खेड-आळंदी विधानसभा दौऱ्यावर आहेत. या वेळी ते मेळाव्यात बोलत होते.