एक्स्प्लोर
खात्यात 15 लाख रुपये टाकू, असे मोदी म्हणालेच नव्हते : साबळे
लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं, लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करण्याचं काम सर्व विरोधक आणि काँग्रेस करत आहे, असेही खासदार सबाळे म्हणाले.

पिंपरी चिंचवड : जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत आणि जाहीरनाम्यातून देखील भाजपने हे आश्वासन दिले नव्हते, असे भाजपचे खासदार अमर साबळे यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोदी सरकारच्या चार वर्षाचा लेखाजोखा मांडताना ते बोलत होते. “जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत आणि जाहीरनाम्यातून देखील भाजपने हे आश्वासन दिले नव्हते. हा विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे.”, असे म्हटले. तसेच, लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं, लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करण्याचं काम सर्व विरोधक आणि काँग्रेस करत आहे, असेही खासदार सबाळे म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























