एक्स्प्लोर

Sunil Shelke : शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं, मात्र हे स्वप्न एक महत्वकांक्षी नेता पूर्ण होऊ देणार नाही, आमदार सुनील शेळकेंचा रोख कोणाकडे?

Sunil Shelke : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून आता थेट आमदारांमध्ये देखील सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला आता अनेक महिने उलटले. याबबातची सुनावणी निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) एकत्रित यावे असं अनेक नेते म्हणतात. अशातच शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून आता थेट आमदारांमध्ये देखील सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कालपासून (शनिवारी) अजित पवारांच्या (Ajit Pawar) आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा सूर आवळला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशीच भावना आमदारांनी व्यक्त व्यक्त केली आहे. अशातच या नेत्यांना एकत्र आणण्याचं स्वप्न एक महत्त्वाकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शरद पवार-अजित पवारांच्या एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी पाहता आज कोण कोणत्या पक्षांमध्ये जाईल आणि कोणाश युती होईल याचा काही विश्वास आणि ताळमेळ राहिलेला नाही. भविष्य काळात अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्रित यावं असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील वाटतं. ते दोघे एकत्र आले तर आम्हाला आंनदच असेल पण हे स्वप्न काही महत्त्वकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही  असं अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे. तर तो महत्त्वकांक्षी नेता कोण आहे, शेळकेंचा रोख कोणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पुण्यामधील अजितदादा गटाच्या तीन आमदारांनी जाहीरपणे शरद पवार आणि दादांनी एकत्र यावं असं बोलत आहेत. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांचा समावेश आहे. या तिन्ही आमदारांनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. 

अण्णा बनसोडेंनी मिसळला अतुल बेनकेंच्या सूरात सूर 


 राजकारणात कधी आणि काहीही होऊ शकतं असं अतुल बेनके यांनी म्हटलं होतं. साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते असं अजित पवार (Ajit Pawar) गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे.

अजित पवार पुन्हा परत येण्यावर काय म्हणाले होते शरद पवार 


पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार पुन्हा परत येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.

 

VIDEO - Sunil Shelke : शरद पवार आणि दादांनी एकत्र याव, मात्र महत्वाकांक्षी नेते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही

 

संबधित बातम्या - Sharad Pawar, Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावर साहेब आणि दादांसाठी मिले सुर मेरा तुम्हारा! अजितदादांच्या आमदारांच्या मनात चाललंय तरी काय?

Ajit Pawar: 'शरद पवार-अजित दादांनी एकत्र यावं, दादांकडे तशी मागणी...'; अतुल बेनकेच्या सुरात दादांच्या आणखी एका आमदाराने मिसळले सूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget