(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC News : पुण्यात मराठा आंदोलकांच्या उपोषण परिसरात 'मार्ग की खोज में' आशयाचं पत्रक वाटलं, अज्ञात व्यक्तीमुळं काही काळ गोंधळ
मनोज जरांगेंना समर्थन देण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाज एकवटला आहे. मात्र भोसरीतील एकदिवसीय उपोषणावेळी एका व्यक्तीमुळं काहीकाळ गोंधळ उडाला.
पुणे : मनोज जरांगेंना (Manoj Jarange) समर्थन देण्यासाठी (Maratha Reservation) पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाज एकवटला आहे. मात्र, भोसरीतील एकदिवसीय उपोषणावेळी एका व्यक्तीमुळं काही काळ गोंधळ उडाला. या व्यक्तीने मराठा क्रांती मोर्चाकडून सुरू असणाऱ्या उपोषण परिसरात 'मार्ग की खोज में' आशयाचं पत्रक वाटलं. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. ही व्यक्ती धर्मांतर करण्यासाठी आली होती, असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
या व्यक्तीवर मराठा कार्यकर्त्यांनी आरोप केल्यामुळे त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. तेव्हा त्याने एका त्रयस्थ व्यक्तीशी व्हाट्सअप ग्रुपमध्ये केलेला संवाद क्लिअर केल्याचं आढळून आलं. तसेच एका फादरने त्याला ही पत्रकं वाटायला दिल्याचं ती व्यक्तीनं सांगितलं आहे. मराठा क्रांती मोर्चाने त्याला विचारलेला हा जाब मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला आहे. ही व्यक्ती धर्मांतरांसाठी कार्य करते, असा आरोप यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहे.
धर्मांतराचा प्रयत्न
हा व्यक्ती धर्मांतराविषयी बोलत होता. धर्मांतर किती महत्वाचं आहे. हे सांगत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच पत्रक वाटत असल्याचंही सांगितलं. मागील काही दिवसांपासून पुण्यात धर्मांतराचे फायदे सांगून धर्मांतर करायला लावल्याचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. आपल्या धर्माचा प्रचार करणारेदखील मोकळेपणाने धर्मांतराबाबत बोलताना आणि फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी येशूचं रक्त म्हणून एका कुटुंबाला डाळिंबाचा रस पाजला होता. त्यानंतर या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावेळी येशूचा प्रचार करण्यात येत आहे आणि धर्मांतराचं महत्व पटवून देत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. असाच प्रकार आज मराठा मोर्चा सुरु असताना दिसून आला.
ठिकठिकाणी मराठा मोर्चा...
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर व परिसर यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी आज हडपसर मध्ये मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर आणि परिसरमधील सकल मराठा समजाच्या वतीने लोकशाही मार्गाने शांतता प्रिय पद्धतीने मराठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेत्यांना गावबंदी तसेच कोणतेही राजकिय कार्यक्रम घेऊ नये यासाठी आवाहन करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द