Manoj jarange Patil : पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, कधी आणि कुठे होणार सभा?
मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट पुणे जिल्हात सभा घेणार आहेत. 20 ऑक्टोबरला खेडची सभा झाल्यानंतर त्यांनी बारामतीत सभा होणार आहे तर 21 ऑक्टोंबरला त्यांची इंदापूरात सभा होणार आहे.
![Manoj jarange Patil : पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, कधी आणि कुठे होणार सभा? Manoj jarange Patil sabha in baramati and indapur on 20 october and 21 october in pune district Manoj jarange Patil : पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, कधी आणि कुठे होणार सभा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/7197fd508408888f4595f617c1d316ba1697618534945442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती, खेड: मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन (Maratha Reservation) आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट पुणे जिल्हात सभा होणार आहे. 20 ऑक्टोबरला खेडची सभा झाल्यानंतर त्यांनी बारामतीत सभा होणार आहे, तर 21 ऑक्टोंबरला त्यांची इंदापूरात सभा होणार आहे. बारामतीत तीन हत्ती चौकात तर इंदापूरात तहसिलदार कचेरी शेजारी त्यांची सभा होणार आहे. 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे जुन्नरच्या शिवनेरी गडावर सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि मग 11 वाजता खेड मध्ये जाहीर सभा घेणार आहे.
राजगुरुनगरमध्येही सभा
आंतरवाली सराटी सारख्या मराठवाड्यातील गावात ऑक्टोबर हीट असूनही लाखो लोकांनी गर्दी केली होती. नजर जाईल तिथपर्यंत मराठे एकवटले होते. यात सर्व वयोगटातील मराठे आंतरवाली सराटीत प्रवास करत दाखल झाले होते. तरुणांचादेखील यात मोठा सहभाग होता. हीच लाखोंची गर्दी आता पुण्यातील खेडमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली.
24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही...
आंतरवाली सराटीनंतर त्यांनी काल (16 ऑक्टोंबर) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचे आता 8 दिवस शिल्लक राहिले आहे. सरकराने आमच्याकडून 40 दिवस घेतले असून, या चाळीस दिवसांत त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.यावेळी बोलता ना जरांगे म्हणाले की, "आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात विरोधकांनी उभं केलय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं. तर, सरकारने आमच्याकडे चाळीस दिवस घेतले आहे. त्यामुळे आरक्षण द्या, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला 5000 पानांचा आधार मिळाले असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. 40 दिवसांची मुदत संपल्यावर 24 तारखेनंतर होणार आंदोलन देखील शांत पद्धतीनेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)