एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident: 'वाचवा, वाचवा' आवाज येताच मोठा स्फोट, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली नवले पुलावरील अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी

Pune Navale Bridge Accident: मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय.

Pune Navale Bridge Accident: मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Accident) गुरुवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले. या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात 3 वर्षांची चिमुकलीही होती. तसेच 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.  

प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, “मी चहा घेत होतो. अचानक जोराचा आवाज आला. मागे पाहिले तर एक कंटेनर नियंत्रण सुटून उतारावरून सर्व वाहनांना धडक देत होता. त्याने एका कारला जबरदस्त धडक दिली. ती कार पुढच्या ट्रकला जाऊन अडकली. आत अडकलेल्या लोकांचा ‘वाचवा, वाचवा!’ असा जीवघेणा आवाज येत होता. आम्ही मदतीसाठी धावलो, पण अचानक मोठा स्फोट झाला आणि आग भडकली. आम्ही मागे सरकलो.  त्याच वेळी एका कंपनीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन घरी निघाली होती. या बसमधील कर्मचाऱ्यांनी घाबरून बाहेर रस्त्यावर उडी घेतली. त्यांच्या मदतीने आम्ही बचाव कार्यास सरसावलो, असे त्यांनी सांगितले. 

Pune Navale Bridge Accident: आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...

तर, दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे की, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो. पण आग भडकल्यामुळे आत अडकलेल्या नागरिकांना वाचवणे शक्य झाले नाही. आम्ही तत्काळ अग्निशमन विभागाला कळवले. नवले पुलाजवळ सातत्याने अपघातांच्या मालिका घडत आहेत. हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 

Pune Navale Bridge Accident: नेमका अपघात कसा झाला?

गुरुवारी सायंकाळी पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका 3 वर्षांच्या चिमुकलीसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. या भीषण दुर्घटनेमागील घटनाक्रम प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे साताऱ्याकडून कात्रजच्या दिशेने उतारावरून भरधाव वेगात येणाऱ्या मोठ्या कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी होताच चालकाचे वाहनावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. ब्रेक न लागल्याने नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने रस्त्यावरच्या 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये अनेक दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहने पूर्णपणे चेंगराचेंगरीसारखी चिरडली गेली. धडकेदरम्यान कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला जबरदस्त ठोकर दिली. 

बसमध्ये 18 ते 20 प्रवासी होते. या धडकेने बस पलटी झाली आणि आत अडकलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. या सर्व गोंधळात कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली. पेटलेला कंटेनर ब्रेक नसल्यामुळे तसाच पुढे घसरत राहिला. पुढे जात असताना कंटेनरने सेल्फी पॉइंटजवळ असलेल्या एका टुरिस्ट कारला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार समोरील दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकून गेली. कार दोन्ही अवजड कंटेनरच्या मध्ये चिरडल्याने त्यातील लोकांना बाहेर पडण्याची कोणतीही संधीच उरली नाही. ते ‘वाचवा, वाचवा’ अशी किंकाळी करत असतानाच कारने पेट घेतला. आगीचा भडका इतका भीषण होता की काही क्षणांतच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. या घटनेत कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि क्लीनर हेदेखील या आगेत होरपळून मरण पावले.

आणखी वाचा 

Pune Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget