खोटी प्रतिष्ठा काही कामाची नाही, मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत, मनोज जरांगेंचं वक्तव्य
लग्नासाठी मुलीचे बाप आणि मुलाचे बाप मोठा खर्च करतात. ते पैसे एकत्र करुन मुलाला व्यवसायासाठी दिले पाहीजेत असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले.

Manoj Jarange : लग्नासाठी मुलीचे बाप आणि मुलाचे बाप मोठा खर्च करतात. ते पैसे एकत्र करुन मुलाला व्यवसायासाठी दिले पाहीजेत असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. लग्नात हुंडा देण्याच्या मुद्यासंदर्भात जरांगे यांनी हे भाष्य केलं. हुंड्याचं परिवर्तन व्यवसायात झालं पाहिजे. खोटी प्रतिष्ठा काही कामाचा नाही. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला लावा असेही जरांगे म्हणाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी रायगडावर (Raigad) जाणार असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. देशमुख कुटुंबही रायगडावर जाणार आहे. आज कुठली बैठक नाही फक्त चर्चा करत आहोत.मराठा आणि कुणबी एक आहे, असा सरकारनं जीआर काढला पाहिजे
29 ऑगस्टला मुंबईला जाणार, मुंबईत राहणार
29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जातीय दोष आहे का नाही? हे पाहावं लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. आता चार महिने वेळ दिला आहे. फडणवीस यांना दोन वर्ष झालं वेळ दिला आहे. मराठा आणि कुणबी एक आहे, त्यांनी जी आर काढला पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या तरुणांवर अनेक केसेस तशाच आहेत त्या मागे घेतल्या नाहीत. मी आता मुंबईत जाणार आहे. त्यानंतर मी माघारी जाणार नाही मुंबईत राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. 58 लाख लोकांच्या नोंदी आहेत. आम्ही दीड वर्ष वेळ दिला आहे. आता मुंबई सोडणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांसमोर देवेंद्र फडणवीस उघडे पडणार असल्याचे जरांगे म्हणाले.
जे जातीवाद करतात त्यांना फडणवीस मंत्रीपद देतात
दीड दीड वर्ष वेळ दिला. आता वेळ दिला जाणार नाही असेही मनोज जरांगे म्हणाले. मुंबईतून माघारी जा म्हणायला कारण नाही. 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्याच सरकारने दिला आहे. ते आता मराठ्यांना वापस पाठवू शकत नाहीत असेही मनोज जरांगे म्हणाले. जे जातीवाद करतात त्यांना मंत्री करतात. जातीवाद करणाऱ्या लोकांना जवळ करतात. जे फेकून दिलं होतं त्याला परत आणलं असे म्हणत नाव मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. जाती जातीत भांडणं लावतात त्यांनाच फडणवीस मंत्री करतात असेही जरांगे म्हणाले. जे जातीत दंगली करतात त्यांना फडणवीस मंत्री करतात. मराठ्यात आणि त्यांच्यात दंगली घडवण्याचा सरकारचा हेतू आहे. धनगर आणि आमचं काहीच नाही पण त्यांना पुढं केलंय. 70 टक्के मराठ लोक ओबीसीमध्ये गेले आहेत. दंगल घडवायचं काम फडणवीस करत आहेत असा आरोप जरांगेंनी केला. भुजबळ यांना पुढं केलं आहे मला विरोध पत्करावा लागणार आहे. मराठा समाज अंगावर घ्यावा लागेल अशी भीती भुजबळ यांना वाटते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली, जरांगेंचा आरोप
फडणवीस शाळेत जोड्या लवायला पक्के असणार असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकांनी शहाणां होण गरजेचं आहे. पापत मी सहभागी होणार नाही. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगेंनी कानाला हात लावला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावल्याची टीका मनोज जरांगेंनी केली. फडणवीसांनी या प्रकरणाचा पुर्ण कार्यक्रम केला आहे. आरोपीच्या वतीने वकिलाने बाजु मांडली मोक्यातून दोषमुक्त करा. हरकत नाही असं सरकारी वकील म्हणत आहेत असे जरांगे म्हणाले.
भुजबळांनी कुठल्या ओबीसीचं चांगल केलं ?
भुजबळांनी कुठल्या ओबीसीचं चांगल केलं आहे. कुठला ओबीसी बांधव प्रशासनात आहे. 450 जातीला काय मिळालं सांगा. हे फुकट नेतेगीरी करत आहेत. ओबीसी लोकांनी शहाणं व्हावं हे आपल्या आपल्यात दंगली भडकवत आहेत असे जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. आम्ही काय खोट बोलत आहोत? आम्ही काय राजकारण केलं सांगा असेही जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांची सरकारने दिलेल्या "शिधा" वर ही टीका केली. कितीही विरोध करा, कितीही उड्या मारा मराठा आरक्षणात येणारच असल्याचे जरांगे म्हणाले. मी माघारी येणार नाही मी मुंबई सोडणार नाही. तिपटीने लोक आणणार हे माझं चॅलेंज असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीस विचित्र माणूस
फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजुला केला पाहीजे. मराठा आणि कुणबीचा जीआर काढावा असे मनोज जरांगे म्हणाले. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. फडणवीस यांनी आया बहिणींची डोकी फोडली म्हणून फडणवीस यांच्या विरोधात बोलतो, असेही मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांनी देशमुख प्रकरण संपूर्ण संपवलं आहे. त्या प्रकरणाची पूर्ण वाट लावली आहे. फडणवीस यांनी ठरवून सगळं संपवल्याचे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला उत्तर देण्यासाठी भुजबळांना मंत्रीपद दिलं
पोलीस कारवाई करत नाहीत. आरोपीच्या वकीलांनी मोका कारवाईतून मुक्त करा असे म्हटलं आहे आणि इकडेच वकील म्हणत आहेत की करा आमची काही हरकत नाही असं कस बोलतात असे जरांगे म्हणाले. आरोपीच्या वकिलाने कोर्टामध्ये बाजू मांडली तर देशमुख यांचे वकील म्हणतात की मोका हटवला तरी हरकत नाही पण हे चुकीचं आहे. मंत्रीपद पाहिजे नाही असं नाही, पण मराठा समाजाला उत्तर देण्यासाठी मला हे पद दिलं अस भुजबळ खासगीत बोलले आहेत असे जरांगे म्हणाले.फडणवीसांनी पहिल्यांदा शिंदेंना आणलं नंतर अजित पवारांना आणलं. मी मुंबईत विजयरथ आणि अंत्ययात्रारथ घेऊन येणार, त्यामुळं सरकारने काय ते ठरवावं असेही जरांगे म्हणाले. संभाजी भिडे यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. त्यांचं रसायन वेगळं आहे. कोंबडीसारखा फड फड करतो, हे फडणवीसांचं रसायन आहे असे जरांगे म्हणाले.
समाजाने मला 3 महिने वेळ द्यावा सगळ्यांचं कल्याण करतो
लक्ष्मण हाके यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, कुणाच्याही पर्सनल मॅटरमध्ये मी पडत नाही. मी यांना विरोधकच मानत नाही त्यांची नावे घेऊ नका. मी त्यांच्यावर बोलत नाही. आता लढाई अंतिम आहे आर किंवा पार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला कितीही मोठं आंदोलन करावे लागलं तरी चालेल. समाजाने मला 3 महिने वेळ द्यावा सगळ्यांचं कल्याण करतो असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासोबत नाद करायचं नाही सरकरने दिलेले आश्वासन पूर्ण करावं असेही जरांगे म्हणाले. अजूनही सरकार मधले कुठल्याही मंत्र्यांची भेट झाली नाही सगळे बिझी आहेत वेळ देत नाहीत यांना मराठ्यांचा द्वेष आहे. त्यांनी याव चर्चेला मी सगळ्यांना वेळ देतो असेही ते म्हणाले.























