एक्स्प्लोर

Pune Railway Mega Block : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पुण्यात रेल्वेचा Mega Bloack, 'या' महत्वाच्या रेल्वे रद्द

पुण्यामध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी (25, 26 नोव्हेंबर) रेल्वेमहामार्गावर विशेष मेगा ब्लॉक राहणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहे

पुणे : पुणे शहर परिसरातील रेल्वे (Pune Railway Block) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये उद्या शनिवारी आणि रविवारी (25, 26 नोव्हेंबर) रेल्वेमहामार्गावर विशेष मेगा ब्लॉक राहणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहे तर काही गाड्यांची वेळ बदलली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यामुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे संदर्भातील माहिती घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

पुण्यामध्ये (Pune) शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक राहणार आहे. खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत.

मेगाब्लॉक काळात पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Queen, Sinhagad Express, Intercity, Koyna and Deccan Express) या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहींच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या 46 सेवा रद्द केल्या आहेत.

दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईहून येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, कोयना एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. 

या कारणामुळे गाड्या रद्द...

पुणे विभागातील लोणावळा ते पुणे मार्गावर खडकी ते शिवाजीनगर दरम्यान यार्ड आणि स्वयंचलित सिग्नलचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील गाड्या रद्द/वळवण्यात येतील/ पुणे विभागातील लोणावळा ते पुणे मार्गावरील खडकी ते शिवाजीनगर दरम्यान 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग चे काम, मिलिटरी यार्डचे इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलचे काम होणार आहे. प्रवाशांनी झालेल्या गैरसोयीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कृपया रेल्वे चौकशी यंत्रणेवर गाडीची सद्यस्थिती तपासून पहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal : 'म्हणून' ओबीसी आंदोलन उभं करायचं योग्य नाही; आता राधाकृष्ण विखे पाटलांनी छगन भुजबळांचे कान टोचले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special ReportSudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वरSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 04 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Embed widget