एक्स्प्लोर

महेश गायकवाडकडेही पिस्तुल होतं, त्याला काढता आलं नाही, गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणात अजित पवारांचा गौप्यस्फोट

भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill line police station) केलेल्या गोळीबारप्रकरणात, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे.

पुणे : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill line police station) केलेल्या गोळीबारप्रकरणात, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं, त्या फायरिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक जिल्हाप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) जखमी झाले. मात्र या गोळीबारावेळी महेश गायकवाड यांच्याकडेही रिव्हॉल्वर होतं, त्या सगळ्या झटापटीत त्यांना ते बाहेर काढता आलं नाही, असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत (Pune) होते. अजित पवारांनी आज पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने (Mauris Noronha) केलेला गोळीबार यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

यावेळी अजित पवार यांना घोसाळकर गोळीबार प्रकरण आणि याआधीच्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन विरोधक राजीनामा मागत असल्याची विचारण्यात आलं. त्यावर अजित पवारांनी सर्व विषयावर प्रतिक्रिया दिली. 

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर भाष्य

यावेळी अजित पवार यांनी उल्हासनगर इथे झालेल्या गोळीबारप्रकरणावर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, "उल्हासनगमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. त्यांचे जमिनीच्या व्यवहारातून गोळीबार झाला. ते दोघेही निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. एक नागरिक म्हणून पोलिसांचं खरोखरच कौतुक केले पाहिजे.  कारण आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर, एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील.. दुसऱ्याकडे (महेश गायकवाड) पण रिव्हॉल्वर होती. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही. नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.

महेश गायकवाड आऊट ऑफ डेंजर

या गोळीबाराच्या आवाजानंतर पोलीस आले, पोलिसांनी तिथं ते कंट्रोल केलं, म्हणजे थांबवलं, त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब  हॉस्पिटलला नेलं. आता तो आऊट ऑफ डेंजर आहे. त्याची माहिती पण आम्ही रोजचे रोज घेतोय. आता पूर्णपणे तो त्याच्यातून बाहेर निघालेला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे लोक होते, सत्ताधारी पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे, असं अजित पवार म्हणाले. 

गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार 

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. 

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड  (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली.  या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.  

अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्हदरम्यान गोळीबार

 मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला.मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात गोवल्याचा राग मॉरिसला होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. 

Ajit Pawar on Ganpat Gaikwad firing : अजित पवार नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या

Mahesh Gaikwad : गोळीबाराला कारणीभूत जमिनीचा वाद, महेश गायकवाड यांची या वादात एन्ट्री कशी? गोळीबाराचं नेमकं कारण समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget