एक्स्प्लोर

कहाणी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर घोटाळ्याची, पोलिसांच्याच तिजोरीवर मारला कोट्यवधींचा डल्ला

Bitcoin Scam : अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ अजित भारद्वाज यांनी काही वर्षांपूर्वी गेन बिटकॉइन नावाची स्कीम सुरु केली

पुणे : आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर घोटाळ्याची आणि या गुन्ह्यात  पोलिसांना मदत करण्यासाठी निवडण्यात आलेल्या दोघांनी पोलिसांच्याच तिजोरीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याची  ही कहाणी आहे  . एखाद्या थरारक वेब सीरिजलाही लाजवेल असा हा प्रकार पुण्यात घडलाय . 2018 साली घडलेल्या क्रिप्टो करन्सीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे सायबर पोलिसांनी  रवींद्र पाटील आणि पंकज घोडे या दोघा एक्सपर्टची  मदत घेतली होती . मात्र पुढे या दोघांनी क्रिप्टो करन्सी जप्त करताना ती  पोलिसांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याऐवजी स्वतःच्या अकाउंटमध्ये जमा केली आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमावले. 

क्रिप्टो करन्सीशी संबंधित भारतातील पहिला गुन्हा 2018 साली पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाला . त्यावेळी या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलिसांना क्रिप्टो करन्सीमधील तांत्रिक गुंतागुंतीची माहिती नसल्यानं पोलिसांनी रवींद्र पाटील आणि पंकज घोडे या क्रिप्टो करन्सीमधील एक्स्पर्ट्सची तांत्रिक मदत घ्यायचं ठरवलं . मात्र हे दोघे  आरोपींकडून जमा होणारी क्रिप्टो करन्सी पोलिसांच्या वॉलेटमध्ये जमा करण्याऐवजी स्वतःच्या वॉलेटमध्ये जमा करत गेले . त्यातून या दोघांनी कोट्यवधी रुपये कमावले . यातील पंकज घोडेने स्वतःची कंपनी स्थापन केली ज्याची उलाढाल अडीचशे कोटींच्या पुढे आहे तर रवींद्र पाटीलकडून पोलिसांनी साडे सहा कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी जप्त केली असून ट्रेजर या आणखी एका  डिव्हाइसमध्ये त्याने लपवलेली क्रिप्टो करन्सी कित्येक कोटींमध्ये असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये बसून या दोघांनी  पोलिसांच्याच तिजोरीवर डल्ला  मारला.  या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर क्राईमच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मते या गुन्ह्याची उकल करण्यासाठी त्यांना कित्येक महिने काम करावं लागलं . क्रिप्टो करन्सीमधील अनेक टर्म्स समजून घ्याव्या लागल्या. त्यानंतर आम्ही रवींद्र पाटील आणि पंकज घोडेला अटक करायचं ठरवलं . 

अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ अजित भारद्वाज यांनी काही वर्षांपूर्वी गेन बिटकॉइन नावाची स्कीम सुरु केली . काहीच दिवसांमध्ये बिटकॉइन दुप्पट करून देण्याची ही योजना असल्यानं जगभरातून लोकांनी काही लाख कोटी रुपये  यामध्ये  गुंतवले .पण त्यानंतर अमित भारद्वाज आणि अजित भारद्वाज गायब झाले . त्यातील पुण्यातील तक्रारदारांनी पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशन आणि निगडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर अमित भारद्वाज सह 17 जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. हा तोपर्यंतचा क्रिप्टो करन्सीमधील पहिला गुन्हा नोंद होता. त्यानंतर संपूर्ण भारतात चाळीसहून अधिक गुन्हे अमित भारद्वाजच्या विरुद्ध नोंद झाले . या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलिसांना यातील काहीच माहिती नसल्यानं त्यांनी त्यावेळी ग्लोबल ब्लॉकचेन कंपनीत काम करणाऱ्या पंकज घोडे आणि के . पी . एम . जी . कंपनीत काम करणाऱ्या रवींद्र पाटीलची मदत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी पोलिसांनी या दोघांना पगार देऊ केला आणि या दोघांनी पुणे पोलीस आयुक्तालयात येऊन सायबर पोलिसांसोबत काम सुरु केलं . पण अमित भारद्वाजच्या अकाऊंटमधून जमा होणारी काही  क्रिप्टो करन्सी त्यांनी सुरुवातीला  पोलिसांच्या वॉलेटमध्ये जमा केली. मात्र त्यानंतर ही क्रिप्टो करन्सी  हे दोघे स्वतःच्या वॉलेटमध्ये जमा करत गेले. 

आज एका बिटकॉइनची किंमत पस्तीस लाखांहून अधिक आहे. अमित भारद्वाजने जगभरातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन ते  बिटकॉइन तयार करणाऱ्या बिटकॉइन माईन्समध्ये लावले . त्यामध्ये अंदाजे एक लाखांहून अधिक बिटकॉइन तयार झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेतील एफ . बी आय . पासून जगातील अनेक तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करतायत . पण 2018 साली आपण नक्की किती मोठ्या प्रकरणाचा तपास करतो आहोत याचा पुणे पोलिसांना अंदाजच नव्हता . त्यामुळे पंकज घोडे आणि रवींद्र पाटीलने नक्की किती रकमेचे बिटकॉइन स्वतःच्या अकाउंटमध्ये वळते केले याचा त्यावेळी पोलिसांना अंदाजच आला नाही . सायबर पोलिसांच्या ऑफिसमध्ये बसूनच आतापर्यतचा सर्वातमोठा सायबर घोटाळा अशाप्रकारे आकाराला येत होता.

 पुणे आयुक्तालय आणि या आयुक्तालयातील अगदी दर्शनी भागात असलेलं हे सायबर क्राईम पोलिसांचं ऑफिस 2018 साली रवींद्र पाटील आणि पंकज घोडे यांना टेक्निकल स्पोर्टसाठी पोलिसांनी त्यांची मदत घेतली आणि त्यांचा इथं वावर सुरु झाला.  पुढे त्यांचा इथे दबदबा वाढला . पण हे दोघे नक्की काय करत होते हे समजायला सायबर पोलिसांना 2022 साल उजाडावं लागलं . आरोपींच्या अकाऊंटमधून क्रिप्टो करन्सी पोलिसांच्या वोलेटमध्ये जमा करण्याऐवजी ते स्वतःच्या वोलेटमध्ये जमा करत गेले . हे सगळं त्यांनी या सायबर ऑफिसमध्ये बसून केलं . जिथे गुन्ह्याची उकल होणं अपेक्षित होतं , गुन्हय्याचा तपास होणं अपेक्षित होतं तिथेच हा गुन्हा घडत होता . 

रवींद्र पाटील हा 2004 च्या बॅचचा आय पी एस अधिकारी आहे. मात्र आय पी एस मध्ये निवड झाल्यानंतर थोड्याच दिवसात राजीनामा देऊन त्याने सायबर एक्सपर्ट म्हणून काम सुरु केलं. एवढंच नाही तर आय ए एस आणि आय पी एस होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना तो मार्गदर्शनी करू लागला . पुणे पोलीस दलातील वरिष्ठांशीही त्याचे नजीकचे संबंध होते . पण पुढे बिटकॉइनच्या रिकव्हरीत घोटाळा झाल्याचा संशय दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या मूळ तक्रारदारांनी व्यक्त केला तेव्हा पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरु केला . युवराज पवार हे यातील तक्रारदार आहेत. त्यांनी त्यावेळी अडीच लाख रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवले होते . बिटकॉइनबाबत आपण ऑनलाईन माहिती घेऊन मग अमित भारद्वाजच्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचं ठरवलं . पण माझ्यासारख्या कित्येकांची त्याने फसवणूक केल्याचं ते म्हणतात . पण पुणे पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना मदत करणाऱ्या रवींद्र पाटील आणि पंकज घोडेचाही आम्हाला संशय यायला लागला आणि आम्ही या दोघांची तक्रार करायचंठरवलं असं युवराज पवार म्हणतात . 

 या तपासात पुणे पोलिसांना  रवींद्र पाटीलने बिटकॉइन मधून मिळालेल्या पैशातून साडे आठ  कोटी रुपयांचे दोन आलिशान फ्लॅट्स त खरेदी केल्याचं आढळून आलं तर त्याच्याकडून साडे सहा कोटी रुपयांचे बिटकॉइन जप्त करण्यात आले. पंकज घोडे हा 2018 पर्यंत ग्लोबल ब्लॉकचेन कंपनीत पन्नास हजार रुपये पगारावर नोकरी करत होता . पण 2018 नंतर  त्यानं एकामागोमाग एक अशा सहा कंपन्या स्थापन केल्या . पुढे त्याने अॅग्री 10 एक्स या नावाने भाजीपाला विकणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीची उलाढाल अडीचशे कोटींच्या पुढे आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी , माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद , अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार , संजय दत्त यांच्यासोबत  त्याचे वैयक्तिक संबंध असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरील फोटोमधून दिसून येतंय . त्यावेळेस पंकज घोडेले पुणे पोलीस दलातील कोणाचा आशीर्वाद  याचा ही पोलीस तपास करतायत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अमित भारद्वाजचं यावर्षी 14 जानेवारीला दिल्लीत कोरोनामुळे निधन झालंय . त्यामुळं बिटकॉइनचा हा घोटाळा नक्की किती मोठा आहे हे उघड करण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे . रवींद्र पाटीलने क्रिप्टो करन्सी स्वतःच्या वॉलेटमध्ये वळती करण्याबरोबरच ती ट्रेजर आणि लेझर या नवणारे ओळखल्या जाणाऱ्या दोन डिव्हाइसेसमध्ये सेव्ह करून ठेवलीय. मात्र त्याचा पासवर्ड तो पुणे सायबर पोलिसांना सांगत असल्याने त्यामध्ये नक्की किती बिटकॉइन आहेत याचा उलगडा अजून होत नाही.

 आज जगभरात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली . काळा पैसा दडवून ठवण्यासाठी या क्रिप्टो करन्सीचा उपयोग होतो. त्यातून टेरर फंडिंग , ड्रग रॅकेट चालवण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे युरोपियन युनियन , अमेरिका , इंग्लंड यासारख्या देशांमध्ये क्रिप्टो  करन्सीच्या वापरासाठी काही नियम तयार करण्यात आलेत. मात्र भारतात अजून क्रिप्टो करन्सी पासून निर्माण होणारा धोका तेवढ्या गांभीर्याने घेतला गेलेला नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात डिजिटल करन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कर लावण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला. पण क्रिप्टो  करन्सीच्या  माध्यमातून होणारे व्यवहार हे वैध की अवैध याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही . जगभरात क्रिप्टो करन्सीच्या वापरातून येणारा धोका लक्षात घेऊन त्याच्या वापसारासाठी नियमावली तयार करण्यात आली. आपल्याकडेही भविष्यातील धोका लक्षात घेऊन क्रिप्टी करन्सी बाबत स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे . 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरPravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 19 November 2024Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget