(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune MPSC Protest : 18 तासानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; तोडगा निघणार का?
Pune MPSC Protest : 18 तासानंतर एमपीएसीची तयारी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन (Student Protest) स्थगित केलं आहे.
Pune MPSC Protest : 18 तासानंतर एमपीएसीची तयारी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन (Student Protest) स्थगित केलं आहे. पुण्यात (Pune) कालपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर अलका टॉकीज चौकात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं आहे. आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दरम्यान, आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यूपीएससीच्या (Upsc)धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होतं. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळं हे आंदोलक विद्यार्थी आज त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जवळपास 700 विद्यार्थी रात्रभर रस्त्यावर बसून होते
पुण्यातील अलका टॉकी चौकात विद्यार्थ्यांचे गेल्या 18 तासापासून आंदोलन सुरु होतं. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिस सातत्यानं समजवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार आहेत, त्यांना तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटण्याचा प्रयत्न करा असेही पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. मात्र, तरीही विद्यार्थ्यांनी रात्रीच्या एवढ्या थंडीत आंदोलन सुरुच ठेवले होते. जवळपास 700 विद्यार्थी रस्त्यावर बसून होते. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहे. त्यामुळं आज यावर तोडगा निघणार का हे पाहावं लागेल.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह इतर शहरात सुरु होतं आंदोलन
जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला नोटीफिकेशन काढण्याचे आदेश द्यावे, असंही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन कालपासून हे आंदोलन सुरु केले होते. काल सकाळपासून शेकडो विद्यार्थी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला होता. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: