एक्स्प्लोर

Ajit Pawar :  भाजपचा करिष्मा फक्त नरेंद्र मोदींमुळेच, त्यांनी देशभर भाजप वाढवला; अजित पवारांकडून मोदींचं कौतुक

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचं कौतुक केलं आहे. भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे. त्यांनी देशभर भाजप पसरवला, अशा शब्दांत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

Ajit Pawar :  विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपात (Ajit Pawar) जाणार, अशा चर्चा रंगल्या असताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचं कौतुक केलं आहे. 'भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पसरवला, अशा शब्दांत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची 'दिलखुलास दादा' ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी आणि भाजपच्या कार्यशैलीसंदर्भात भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, 2014 मध्ये पहिल्यांदाच बहुमताने भाजप निवडून आला. 2014 आणि 2019 मध्ये एकहाती सत्ता घेणारा पक्ष हा भाजपच होता. या काळात नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप सर्वदूर पोहचला. नरेंद्र मोदींचा करिष्मा हा देशात चालला आणि त्यांनी देशातील करोडो जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांची भाषणंदेखील गाजले. भाषणं करत असताना त्यांनी जनतेला आपलंसं केलं होतं. त्यानंतर जनतेला वाटलं की आपण नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे सूत्रं द्यावीत आणि जनतेनेही मतांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींकडे देशाचे सूत्रं दिली, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. 

यापूर्वी 'हे' कोणालाही जमलं नाही...

अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं सर्वसमावेशक नेतृत्व भाजपमध्ये होतं. त्यासोबतच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे सगळे एकेकाळी भाजपच वाढवण्याचं कार्य करत होते. त्यावेळी या सगळ्यांना जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं. 1984 नंतर पहिल्यांदा 2014 मध्ये पूर्ण बहूमत असणारं सरकार अस्तित्वात आलं. 1984 नंतर कधीही भारतात पूर्ण बहूमत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. मात्र हे एकहाती सत्ता नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली. त्यांनी केलेला हा करिष्मा आपल्याला नाकारता येऊ शकत नसल्याचं ते म्हणाले.

मोदीनंतर कोण?

मोदींचा करिष्मा आपण पाहिला आहे. आता त्याच्यानंतर कोण? असं विचारल्यास एकही नाव पुढे येत नाही. मोदींनंतर कोण?, असं अजित पवारांना विचारल्यास वेळ येईल तेव्हा नक्की उत्तर देईल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. अजित पवारांचं हे उत्तर ऐकताच सभागृहात हशा पिकला. 

...आता आघाडी सरकारच चालणार!

नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे हे बघायला हवं. देशाचं भलं कशात आहे हे पाहिलं पाहिजे आणि भारताला पुढे नेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Embed widget