एक्स्प्लोर

Sharad Pawar Lonavala : मोठी बातमी : अजित पवारांना पहिला धक्का, दादांसोबत गेलेले कार्यकर्ते शरद पवार गटात परतले, म्हणाले, बाप बाप असतो!

मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आज धक्का देत आहेत. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते  शरद पवार सोबत येणार आहेत.

पुणे : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) शरद पवार  (Maharashtra Political News)आज धक्का देत आहेत. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते  शरद पवार  (Sharad Pawar) यांच्या सोबत येणार आहेत. बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? , असं म्हणत अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोणावळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
कार्यकर्ते म्हणाले की,  बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? ,मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करायला गेलेत. मात्र आम्हाला संविधान वाचवायचं आहे. यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतो,. असं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 

'शरद पवार हे लोकशाही टिकवणारे आणि रोजगार देणारे नेते'

ते पुढे म्हणाले की,  2014 नंतर देशाच्या संविधानाला कमकुवत करण्याचं काम सुरु आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यातच देशाचा आणि राज्याचा एक विचार तोडण्याचं काम सध्या राज्यात दिसत आहे. राज्यातली पुरोगामी संस्कृती तोडून, राज्याला तोडून, पक्ष मोडून अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याची कामं सुरु आहे. शरद पवार हे लोकशाही टिकवणारे आणि रोजगार देणारे नेते आहेत. अजित पवार फक्त खुर्ची वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. 

जुलैपासून हे सगळे कार्यकर्ते अजित पवार गटात होते. मात्र या कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांना रामराम करत शरद पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अजित पवारांच्या अनेक गोष्टी आम्हाला खटकल्या आहेत. ज्या भाजपबरोबर एवढे वर्ष विरोधात लढलो. आज त्यांच्याबरोबरच काम करायचं हे न पटण्यासारखं आहे. आम्ही सगळेच शरद पवारांच्या विचारांशी सहमत आहोत आणि आम्हीच त्यांचा वारसा पुढे नेणार आहोत. 

अजित पवारांना धक्का!

या कार्यकर्त्यांचा शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यासोबतच येत्या काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका येत आहे. त्यामुळे जर कार्यकर्ते नाराज असतील आणि शरद पवारांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवत असतील तर यामुळे अजित पवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

Murlidhar Mohol Pmc Banner : 'आता बास झालं, तुला नक्की पाडणार'! मोहोळ अण्णांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच पुण्यात बॅनरबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget