एक्स्प्लोर

Pune News: 'मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं.. गाजर दिलं...', राष्ट्रवादीचं पुण्यात महागाई विरोधात आंदोलन

'मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं.. गाजर दिलं...', अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात महागाई विरोधात आंदोलन केलं.

Pune News:  देशासह महाराष्ट्रातील महागाई विरोधात पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जंगली महाराज रोडवरील झाशी राणी चौकात आठवडी बाजार भरवून राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढत आहे, पेट्रोलचे भाव गगणाला भिडले आहे. नागरिकांचा यात मानसिक, आर्थिक छळ होत आहे, असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या आंदोनलाच्या वेळी मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं गाजर दिलं, अशा घोषणाबाजी करण्यात आली. मोदींच्या आश्वासनाचा हा बाजार आहे. 2014 साली मोदींनी अनेक आश्वासन दिलं मात्र एकही पुर्ण केलं नाही त्याउलट प्रचंड प्रमाणात वस्तुंच्या किंमती वाढवल्या. भाजीपासून तर सिलेंडरपर्यंत किंमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्याचं जगणं मुश्किल केलं आहे. मोदींनी गाजर दाखवून अनेक आश्वासनं दिली होती त्यामुळे आज आम्ही गाजर घेऊन आणि आठवडी बाजार भरवून हे आंदोलन करत आहोत. यापुर्वी देखील आम्ही अनेकदा आंदोलन छेडले होते. मात्र आज जीवनावश्यक वस्तुंचा बाजार मांडून नागरिकांना कोणत्याच वस्तू स्वस्तात मिळत नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.


आठवडी बाजार भरवून पहिल्यांच असं आगळंवेगळं आंदोलन आम्ही करत आहोत. हे आमच्या आस्तित्वाचं आंदोलन आहे. महागाई कमी करा नाही तर चले जाओ असं म्हणत आम्ही आज आंदोलन करत आहोत. गाजर दाखवून मोदींनी महागाई वाढवून सामान्य नागरिकांचा मोदी सरकार छळत आहे. त्यामुळे मोदींच्या नावाचा बाजार भरवला आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितलंय.

आंदोलकांनी पुण्यातील रस्त्यावर चक्क जीवनावश्यक वस्तूचा बाजार मांडत त्याला मोदी महागाई बाजार असं नावं दिलं आहे. या बाजारात केळी, गाजर, भाज्या, मासे, पुस्तकं यासगळ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहे. महागाई कमी केली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ अशा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यानी दिला आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Sachin Ghaywal : विस्कटलेले केस, दाढी वाढलेली, ओळखायला येईना अशी अवस्था; गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळचा पहिला फोटो समोर, पुण्यातून पोहोचला राजस्थानमध्ये
विस्कटलेले केस, दाढी वाढलेली, ओळखायला येईना अशी अवस्था; गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळचा पहिला फोटो समोर, पुण्यातून पोहोचला राजस्थानमध्ये

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget