Pune- Mumbai ExpressWay : मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा!
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंंडी निर्माण झाली आहे. मुंबईहून पुण्याला जात असणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात (mumbai pune express highway) वाहतूक कोंंडी निर्माण झाली आहे. मुंबईहून पुण्याला जात असणाऱ्या मार्गावर वाहनांच्या(mumbai pune express highway traffic) लांब रांगा लागल्या आहेत. शनिवार -रविवारच्या सुट्ट्या असल्याने विकेंड (Long Weekend) सेलिब्रेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी (traffic jam) झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहे.
विकेंड म्हटलं की मुंबई- पुणे एक्सप्रेस वे आणि वाहतूव कोंडी हे समीकरण आतापर्यंत अनेकदा आपण पाहिलं आहे. त्याची प्रचिती आजही आल्याचं पाहायला मिळालं आहे. शनिवार असल्यामुळे अनेक मुंबईकर आपल्या गावी जात असतात आणि लाँग विकेंड असल्याने काही लोक पर्यटनस्थळी निघाले आहेत. या सगळ्या प्रवाशांच्या मोठा ताण हा मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर आला आहे. बोरघाटात वाहनांचा वेग मंदावतो आणि परिणामी वाहतूक कोंडी होते.
पुढील काही तास या महामार्गावर अशी वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे. प्रवाशांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. विकेंडला पुणे आणि मुंबईत जवळ अनेक पर्यटन स्थळं आहे. या सगळ्यात पर्यटन स्थळावर पर्यटक मोठी गर्दी करत असतात. त्यामुळे त्याचा ताण या महामार्गावर आल्याचं कायम बघायला मिळतं. परिणामी काही परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे देशातील मोठ्या महामार्गांपैकी एक
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5 तासांवरून 2 तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी अनेक खाजगी वाहनं, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे.
- Shivajirao Adhalrao Patil : मी शिरूर लोकसभा लढणारचं! पुणे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर शिवाजी आढळरावांची डरकाळी, पण कोणत्या चिन्हावर की अपक्ष?
- Pune Lonavala Mega Block :पुणे-लोणावळा मार्गावर 18 फेब्रुवारीला मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून घ्या!