एक्स्प्लोर

Sikandar Sheikh Meet sharad Pawar : आता राष्ट्रीय स्तरावर खेळ; शरद पवारांचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला मोलाचा सल्ला

Sikandar Sheikh Meet Sharad Pawar : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनीशरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी सिकंदर शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

बारामती, पुणे : यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) सिकंदर शेख (Sikandar Sheikh) ठरला आहे. त्यामुळे त्याचं राज्यभरातून कौतुक होत आहे. याच दरम्यान त्याने शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.  शरद पवारांसोबतच सुप्रिया सुळे यांचीदेखील त्याने भेट घेतली आहे. शरद पवारांनी सिकंदर शेखला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्यासोबतच तुम्ही आता राष्ट्रीय स्तरावरती खेळले पाहिजे असा देखील सल्ला शरद पवारांनी त्याला दिला आहे. गोविंद बागेत जाऊन सिकंदर शेखने शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आहे. 

मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक... 

काही दिवसांपूर्वी सिकंदर शेख यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यासोबतच सिकंदर शेखचं सर्वस्तरावरुन कौतुक होताना दिसत आहे. मागील महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षेला यंदा चितपच करत सिकंंदर शेखने महाराष्ट्र केसरीच्या किताबावर यंदा नाव कोरलं. त्यानंतर  सोलापूरातील मुळ गावीदेखील त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. 

उद्धव ठाकरेंची घेतली भेट...

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून पुष्पगुच्छ, शाल देत स्वागत करण्यात आलं. 'तू चाल पुढं', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कौतुक केल्याचं सिकंदर शेखनं सांगितलं होतं. यावेळी त्याचे मित्र आणि काही पैलवानदेखील हजर होते. उद्धव ठाकरेंनी चांदीची गदा हातात धरुन फोटोशूटदेखील केलं होतं. काही अडचण असल्यास मला नक्की सांग, असं  उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सिकंदर शेख म्हणाला. 

असा रंगला सामना...

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबाची लढत रंगली. सिंकदरने माती, तर शिवराजने गादी विभागातून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करून अंतिम फेरी गाठली होती. प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा सुरु होती. सिकंदरने मातीवरील अंतिम विभागात आपला लौकिक कायम राखताना वेगवान आणि आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीतच संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून केसरी किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली होती.

महत्वाच्या इतर बातम्या :

Sharad Pawar : भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळे अजित पवारांकडे पोहचल्या; शरद पवार काटेवाडीत जाणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Embed widget