Khed Alandi Assembly Constituency: बाबा काळेंच्या गळ्यात आमदारकीची माळ! माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांना पराभवाचा धक्का, किती मतांचा फरक?
Khed Alandi Assembly Constituency: बाबा काळे यांनी 51743 मतांच्या फरकाने विजय मिळवला. बाबा काळे यांना 150152 मतं मिळाली. दिलीप मोहिते यांना 98409 मतं मिळाली आहेत.
Khed Alandi Vidhan Sabha Elections : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ (Khed Alandi Vidhan Sabha Elections) हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. राजगुरुनगर खेड आळंदी मतदारसंघाचे मुख्यालय आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलंच वर्चस्व आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. दरम्यान आत्ता या मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे मूळचे खेड तालुक्यातील शेल पिंपळगावचे आहेत. दिलीप मोहिते पाटील यांचे 1999 सालापासून खेड तालुक्यामध्ये वर्चस्व आहे. मात्र पहिल्यांदा या मतदारसंघात बाबा काळे यांनी मोठा विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेच चित्र बऱ्याच ठिकाणी दिसले. खेड-आळंदीमध्येही असेच चित्र दिसणार का, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, यंदा महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते पाटील यांना, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाबा काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. दिलीप मोहिते पाटील आणि बाबा काळे यांच्यातील लढत महत्त्वाची होती. आज खेड-आळंदी मतदारसंघ माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. बाबा काळे यांनी 51743 मतांच्या फरकाने विजय मिळवला. बाबा काळे यांना 150152 मतं मिळाली. दिलीप मोहिते यांना 98409 मतं मिळाली आहेत.
मतदारसंघात राजकीय वर्चस्व कोणाचं?
2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहिला होता. मात्र, पुन्हा एकदा 2014 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून निसटून शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी जिंकली. त्यानंतर पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला आणि दिलीप मोहिते यांनी पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवला आणि शिवसेनेचा प्रभाव कमी झाला. खेड आळंदी मतदारसंघावर आपली पकड पुन्हा मजबूत बनली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता मतदारसंघात काय होईल याबाबतची उत्सुकता लागली होती.
विधानसभेचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडून बाबा काळे यांना उमेदवारी दिली होती.
2019चा निकाल काय होता?
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते यांनी विजय मिळवला. दिलीप मोहिते यांना एकूण 96866 मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार सुरेश नामदेव गोरे एकूण 63624 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा 33242 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्ष असा सामना होणार आहे.