Ajit Pawar: ...तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी
Ajit Pawar: मुळशी तालुक्यातील सुनील चांदेरे आणि बाबा कंधारे या दोघांना अजित पवारांनी आपल्या भाषेत समज दिली आहे.
पुणे : पुण्यात आज राष्ट्रवादीची (NCP) आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं तसेच अंतर्गत वादावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत. कामं केली नाहीत कानखाली देईन किंवा पद काढून घेईल असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले आहे.
आपला जिल्हा 13 तालुक्याचा आहे. प्रत्येक तालुक्यामधून दहा वाहनं वर्धापनदिनासाठी आली पाहिजे. सभा भव्यदिव्य झाली पाहिजे. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत, कामं केली नाहीत तर पद काढून घेऊ, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले.
काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील सुनील चांदेरे आणि बाबा कंधारे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एका लग्नात हाणामारी झाली. सुनील चांदेरे हे पुणे जिल्हा बँकेवर संचालक आहेत. तर बाबा कंधारे हे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. या दोघांमधे वाद आहे. या वादातून बाबा कंधारेंनी सुनील चांदेरे यांच्या कानाखाली लगावली होती. आज अजित पवारांनी या दोघांना त्याच भाषेत समज दिली. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर हे दोघेही बैठक संपताच बैठकीच्या ठिकाणावरून गायब झाले. मात्र मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच बोलणं हे वडिलांच्या नात्याने होतं असं म्हणत आम्ही अजित पवारांचे रागावणे मनाला लावून घेत नाही असं म्हटलय.
पाहा काय म्हणाले अजित पवार?
टीकात्मक बोलणे हा विरोधकांचा जन्मसिद्ध अधिकार
ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मारक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल चांगली बोलण्याची अपेक्षा का करता? आमच्याबद्दल टीकात्मक बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
महिलांना प्रतिनिधित्व न देणे योग्य वाटत असेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत दिल्ली वारी होत आहे.त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, वीस जणांच मंत्रिमंडळ चांगल पद्धतीने काम करू शकते. तसेच महिलांना प्रतिनिधित्व न देणे हे त्यांना योग्य वाटत असेल एवढ्या मोठ्या महिला प्रतिनिधिंना अपमानित करणे योग्य वाटत असेल.
हे ही वाचा :