एक्स्प्लोर

Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

Accident: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली.

Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. 

अद्याप 15 ते 20 प्रवासी अडकल्याची भीती

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

खासगी बसमध्ये गोरेगाव बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) 

सध्या मदतकार्य सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.  

अपघातातील मृतांची नावे

१) जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुबई
२) यश सुभाष यादव
३) कुमार. विर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष
४) कुमारी.वैभवी साबळे, वय १५ वर्ष
५) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष
६) सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष 
७) मनीष राठोड, वय २५ वर्ष,
८) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई 
९) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई.
१०) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई.
११) अभय विजय साबळे, वय २० वर्ष,मालाड,मुंबई.

१२) स्वप्नील धुमाळ वय, 22

13) एक मयत ओळख पटलेली नाही.

24 जखमींची नावे

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29

2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.

3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.

4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव.

5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.

6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.

7) आशिष विजय गुरव, वय 19,  दहिसर.

8) सनी ओमप्रकाश राघव,  वय 21-  खालची खोपोली.

9) यश अनंत सकपाळ, वय 19- गोरेगाव.

10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.

11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.

12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.

13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.

14) रुचिका सुनील धूमणे, वय 17 गोरेगाव.

15) ओम मनीष कदम, वय 18 गोरेगाव.
16) युसूफ उनेर खान, वय 14 गोरेगाव.

17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20 रत्नागिरी,

18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 मुंबई.

19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20 कांदिवली.

20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24 खोपोली, सोमजाई वाडी 

21) दिपक विश्वकर्मा, वय 21 कांदिवली.

22) हर्षदा परदेशी

23) वीर मांडवकर

24) मोहक दिलीप सालप, वय 18 मुंबई.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget