एक्स्प्लोर

मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

विशेष म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे मार्गामध्ये अडचण निर्माण होण्याची महिनाभरातील चौथी घटना आहे.

पिंपरी चिंचवड : लोणावळ्याजवळ मंकी हिलमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या मार्गात विघ्न निर्माण झालं आहे. हुबळी एक्स्प्रेसवर पहाटे साडे पाच ते सहाच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणावळा आणि खंडाळा स्टेशनदरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने हुबली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसवर भलामोठा दगड आदळला. छप्पर फुटून हा दगड थेट स्लीपर डब्ब्यात पडल्याने इथे झोपलेले तीन प्रवासी जखमी झाले. दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तर या मार्गावरील रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरड कोसळल्याने हुबळी एक्सप्रेस एक तास उशिराने धावत आहे. दिलासादायक बाब म्हणजे इतर रेल्वेवर या घटनेचा परिणाम झालेला नाही. मात्र मुंबईहून निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस ही अतिवृष्टीमुळे काही काळ उशिरा धावत आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे मार्गामध्ये अडचण निर्माण होण्याची महिनाभरातील चौथी घटना आहे. 22 जुलै रोजी मंकी हिलजवळ रेल्वे रुळ खचल्याने मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस खोळंबली होती. Hubli_Express_Landslide_2 तर 19 जुलै रोजी मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेससमोर काही मोठे दगड आल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या. 18 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरून घसरलं आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर त्याच मार्गावर छोटे दगड कोसळले. यामुळे चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यापूर्वी, 30 जानेवारी रोजी याच ठिकाणी रेल्वे रुळावर दरड कोसळून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तीन कर्मचारी जखमी झाले होते. सुदैवाने यावेळी कुठलीही रेल्वे तिथून पास होत नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या घटनेनंतर रेल्वे वाहतूक सुमारे एक तास बंद होती. संबंधित बातमी मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला, कोयना एक्स्प्रेस एक तास खोळंबली
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget