Lalit Patil Drug Case : डॉ. देवकातेला कोणत्या मंत्र्यांचा पाठिंबा, याचा तपास करा; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा आक्रमक
ससून रुग्णालयातील डॉ. प्रविण देवकातेंना ललित पाटील प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र देवकातेंच्या मागे असलेल्या मंत्र्यांपर्यंत हा तपास पोहचायला हवा, असं आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
Lalit Patil Drug Case : पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयातील(Lalit Patil Drug Case) ऑर्थोपोडीक सर्जन डॉ. प्रविण देवकातेंना ललित पाटील प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र देवकातेंच्या मागे असलेल्या मंत्र्यांपर्यंत हा तपास पोहचायला हवा, असं कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पोलीस कर्मचारी, येरवडा कारागृहातील कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील कर्मचारी अटक झालेत. पण या सर्व यंत्रणेला कामाला लावणाऱ्या मंत्र्यांची चौकशी होण्याची गरज आहे, असं आमदार रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
रवींद्र धंगेकर म्हणाले की, डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी जरी अटक केली असेल तरीही हा तपास पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही. ललित पाटील प्रकरणाचा तपास अजूनही अर्धवट आहे. ज्या वेगाने या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. त्या वेगाने या प्रकरणाता तपास होताना दिसत नाही आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. पोलिसांची चर्चादेखील केल्या होत्या. त्यावेळी ललित पाटील प्रकरणाच्या तपासाला गती देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. ज्या पद्धतीने ललित पाटील ड्रग्स रॅट चालवत होता. त्यासाठी त्याला अनेकांचा आशीर्वाद लाभत होता, असा आरोप धंगेकरांनी केला आहे आणि पुन्हा एकदा या प्रकरणात संशयाची सुई पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्याकडे वळवली आहे.
डॉ.संजीव ठाकूरला अटक करा...
यात डॉ. संजीव ठाकूरदेखील दोषी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांनादेखील अटक करायला हवी. जोपर्यंत या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांना अटक केली जात नाही. त्यांना नेमके कोणत्या नेत्यांचे फोन येत होते?, कोणत्या पोलिसांचे फोन येत होते. याची माहिती समोर यायला हवी. त्यासाठी संजीव ठाकूर यांना अटक करुन त्यांचा मोबाईल चेक करायला हवा. नाहीतर त्यांची नार्को टेस्ट व्हायला हवी. कारण ललित पाटील कोणत्याही राजकीय वरदहस्ताच्या पाठिंब्या शिवाय एवढं मोठं ड्रग्स चालवू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
ललित पाटीलचे आयफोन अजूनही बंदच...
ललित पाटीलचे दोन आयफोन जप्त करण्यात आले होते. मात्र हे दोन्ही आयफोन ओपन करण्यात पुणे पोलिसांना यश आलं नाही. ललित पाटील आपल्या दोन्ही मोबाईलचे पासवर्ड सांगत नाही आहे. ललित पाटीलचा मोबाईल ओपन झाला तर यातून अनेकांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-
ललित पाटील प्रकरणातील मोठी बातमी; ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक