ललित पाटील प्रकरणातील मोठी बातमी; ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक
डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते.
पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते (Pravin Devkate) यांना अटक करण्यात आली आहे. ड्रग माफिया (Drug Case) ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली होती. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्यात आले होता.
ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवले आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृह प्रशासन रडारवर
ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघेही अटकेत आहे. सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मरसळे हा ललित पळून जाण्याच्या दोन दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. डॉ. संजय मरसळे यांनीच पैसे घेऊन ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी "रेफर" केलं जाते. डॉ. संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडे चे "कॉल" सापडले होते. बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार होता
ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून (Pune Police) आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ज्या डॉक्टरांनी ललित पाटील यांच्यावर उपचार केले त्यांची सखोल चौकशी आणि जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली. ललित पाटील पलायन प्रकरणी ससूनमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे.