Pune Chandani Chowk Bridge : '...नाहीतर पुणेकरांनी टोमण्यांनी चांदणी चौकातील पूल पाडला असता', जोक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल
चांदणी चौकातील पूल पाडण्यावरुन सध्या सोशल मीडियावर भन्नाट रिल्स आणि विनोद व्हायरल होत आहेत. अनेक लोक त्यावर रिल्स तयार करत आहेत. अनेक लोक वेगवेगळे गाणे लावत इंस्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर करत आहेत.
Pune Chandani Chowk Bridge : पुण्यातील चांदणी चौकातील (chandani Chowk ) पूल आज (1 ऑक्टोबर) पाडण्यात येणार आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती इडिफाईस इंजिनिअर या कंपनीने दिली आहे. मात्र पुण्यात (Pune) एखादी घटना घडणार आणि त्यावर व्हिडीओ आणि विनोद व्हायरल होणार नाही, असं शक्यच नाही. पुणेकरांच्या करामती, त्यांच्या सूचना, त्यांनी मारलेले टोमणे कायम हटके असतात. शिवाय त्यांचे सल्लेदेखील अनेकदा भाव खाऊन जातात.
वाहतुकीस अडथळा ठरत असलेला चांदणी चौकातील पूल आज इतिहास जमा होणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा पूल पाडण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मात्र हाच पूल पाडण्यावरुन सध्या सोशल मीडियावर भन्नाट रील्स आणि विनोद व्हायरल होत आहेत. अनेक लोक त्यावर रील्स तयार करत आहेत. लोक वेगवेगळी गाणी लावत इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर करत आहेत.
चांदणी चौकातील पूल पाडण्यावरुन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विनोदांवर एक नजर टाकूया..
1) च्यामायला....🤔🤔🤔🤔
मोजून ४ मीटरचा चांदणी चौक पुल पाडायचाय ..
आव तर असा आणलाय जशी काही चीनची भिंत पाडणार आहेत...
🧐🧐🧐🧐
2) पुण्यातले सगळे Bridge पाडा पण जर Z bridge ला हात जरी लावला तर राडा होणार.....
अखिल बच्चा,बाबू,शोना,पिल्लू संघटना
3) पुणेकरांना हायवे वरुन रोज प्रवास करायचा असतो...
शिवाय पुणेकर अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात....
क्षृल्लक गोष्टींकडे पुणेकर फार फार लक्ष केंद्रीत करत नाही...
... नाहीतर पुणेकरांनी टोमन्यांनी
4) 'बर्लिन वॉलचे तुकडे जसे जर्मनी मधल्या लोकांनी आठवण म्हणून आपल्या घरी नेले, तसे पुणेकरांनी 'चांदणी चौक' पुलाचे तुकडे आपल्या घरी आठवण म्हणून नेले तर साफसफाई लवकर होईल...!!!
5) पावसाने चांदणी चौकात लावलेले स्फोटकं पावसाने फुस झाले तर सगळा पैसा पाण्यात जाणार...
6) आज चांदणी चौक ब्रिज चे अंतिम दर्शन केले. बरेच लोक जमले होते गाड्याच्या रांग ४ कि. मी. (का लिटर?) पर्यत लागल्या होत्या.इतक्या गर्दीत सुद्धा त्या ब्रिजने मला ओळखले. रडत होता बिचारा त्याच्या डोळ्यातील पाणी उतारावरून पार कोथरूड बावधन पर्यत रस्त्याच्या बाजूच्या नाली मधून जात होते. माझ्याशी रडत रडतच बोलला की "माझ्या खाली बॉटल नेक होते म्हणून मला पाडणार म्हणे" मी कित्येक वर्षे गार्डन कोर्ट बुनिदा, बंजारा हिल्स आणखीन कोण कोणत्या धाब्यावरऊन फुल बॉटल मारून आलेल्या ना सुखरूप पणे बावधन, कोथरूड नाहीतर मुळशीच्या दिशेने सुखरूप पोहचवले. कोणाला कधी पुला वरून पडू दिले नाही. तरी सुद्धा मला पाडणार आहेत. तेही ड्राय डे च्या मुहूर्तावर😭 तो छटाकभर उंचीचा भिडे पुल पुण्यात किती पाऊस पडला हे ठरवतो आणि दरवर्षी जून जुलैच्या वर्तमान पत्रात मानाचे स्थान मिळवतो आणि मी मुळशी बावधन कोथरूड NDA ला जोडणारा एकमेव दुवा असून ही कधी प्रसिद्धी नाही घेतली. तो म्हात्रे ब्रिज काही न करता उद्घाटन करण्याच्या दिवशी पडला आणि मला पाडायला महानगरपालिकाने किती फौज फाटा कामाला लावला आहे. त्या पिवळ्या मशीनी चारही बाजूने आक्रमण करत आहेत. बुडाला सुरुंग ही लावला आहे. ते उडाले माझा ढिगारा होणार ५ सेकंदांत! ये तेव्हा पाहण्यासाठी अस्सल पुणेकरांच्या सारखा! तो Z ब्रिज म्हणजे वाहतुकी साठी आहे की प्रेमी युगलना हक्काचे आडोशाचे स्थान देण्यासाठी बनला आहे. पुस्तके कादंबरी ही छापतात त्याच्या नावाच्या! माझ्या नाही छापल्या? तसेही माझ्या इथे चारी बाजून ट्राफिक पोलीस ताफा घेऊन असतात कित्येक वर्षा पासून! ड्रोन कॅमेरातुन पाहिले की काळ्या रस्त्यावर बगळे कुठले आणि पोलीस कुठले हेच कळत नाही. आता जाता जाताअसे वाटते मलाच दोन्ही बाजूने जोड लावून खालचा महामार्ग चार पदरी केला असता तर? माझ्या शेजारी आणखीन जुळा पुल बांधला असता तर माझे अस्तित्व राहिले असते. असो!
अखेरची ही भेट आपुली,
सांगु या वेदना कुणाला?
आम्ही जातो आमच्या गावा आमचा अखेरचा राम राम घ्यावा.
7)
8)
Watch this story by Sharad Bodage on Instagram before it disappears.
null