एक्स्प्लोर

Pune Chandani Chowk Bridge Demolition : असा पाडण्यात येणार चांदणी चौकातील पूल, पाहा टीझर...

Pune : पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील  पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात   येणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे आणि प्राथमिक स्फोटाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील (Pune) वाहतुकीस (Traffic) अडथळा असणारा चांदणी चौकातील (Chandani Chowk)  पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात (Bridge Demolish)   येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे आणि प्राथमिक स्फोटाचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा पूल कशापद्धतीचा स्फोट करुन पाडण्यात येणार आहे, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामधे फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यातील तीन व्यक्ती पूल पाडण्याचे काम करणाऱ्या इडिफाईस इंजिनियरिंग  (Edifice engineering) कंपनीचे अधिकारी असतील. तर एक पोलिस अधिकारी असेल.  पूल पाडण्याच्या आधी 200 मीटरच्या अंतरावरील सर्वांना बाजूला हटवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

कंपनी सुमारे 600 किलो स्फोटकं वापरणार

स्फोटासाठी इमल्शन आणि डिटोनेटिंग फ्यूज वापरणार आहोच. इमल्शन कॅप्सूल प्रत्येकी 25 किलोच्या बॉक्समध्ये येतात आणि आम्ही सुमारे 20 बॉक्स ऑर्डर केले आहेत. याशिवाय सुमारे 50-100 किलो डिटोनेटिंग फ्यूज वापरणार आहोत, असं इडिफाईस इंजिनियरिंग  कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

महामार्गाचा काही भाग बंद राहणार

पूल पाडण्याच्या कालावधीत महामार्गाचा काही भाग बंद राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.  साताऱ्याला जाणाऱ्या नागरिकांनी सिंहगड रोड, कोथरुड, वारजे या मार्गाचा वापर करावा. मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर या कालावधीत वडगावच्या नवले पुलापासून वाहनांना पुणे शहरात प्रवेश करावा लागेल आणि त्या वाहनांना पाषाण किंवा बाणेर मार्गे महामार्गाला जाता येणार आहे. ज्या वाहनांना मुंबईहून सातारला जायचं असेल त्यांना या कालावधीत वाकड- बाणेर मार्गे पुणे शहरात यावं लागेल आणि वडगावचा नवले पूल किंवा कात्रज चौक मार्गे महामार्गाकडे जाता येणार आहे.

काही सेंकदात पूल इतिहासात जमा होणार

पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक  कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे

 

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Embed widget