एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane death: हगवणे जेसीबी विक्री प्रकरणात इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात, आज लीगल डिपार्टमेंटची होणार चौकशी, मशीन ताब्यात घेणारा एजंट कोण?

Vaishnavi Hagawane death: तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांक हगवणेने त्याचा ताबा कसा काय घेतला? याचं गूढ उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे.

पिंपरी: हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांक हगवणेने त्याचा ताबा कसा काय घेतला? याचं गूढ उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे. शशांक आणि लता हगवणे या माय-लेकाने येळवंडे यांची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी माय-लेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर म्हाळुंगे पोलिसानी थेट इंडसन बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलेलं आहे. 

आज चौकशीवेळी जेसीबी मशीन व्यवहारातील आर्थिक फसवणूकप्रकरणी बँकेचा रिकव्हरी एजंट कोण होता? त्याने बँकेला माहिती देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया करून जेसीबी मशीन ताब्यात घेतली होती का? या सर्व गोष्टींता तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी एजंटकडे महाळुंगे एमआयडीसी पोलिस चौकशी करणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जेसीबी खरेदीचा व्यवहार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. पोलिसांनी शशांकचा जबाब सादर करून पोलिस कोठडी मागितली. या प्रकरणी माय-लेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिकव्हरी एजंटने अनधिकृतपणे जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी मांडलेली भूमिका

जेसीबी मशीन खरेदीचा व्यवहार नोंदणीकृत करण्याऐवजी त्याची 'नोटरी' केली. त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही, याचा तपास करायचा आहे. प्रशांत येळवंडे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे शशांक आणि लता हगवणे यांनी काय केले, ते पैसे कुठे गेले, या सर्व बाबींचाही तपास करायचा आहे. येळवंडे यांच्या ताब्यात असलेले जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याची शंका आहे. याबाबत संबंधित बँकेला माहिती नसल्याचीही शक्यता आहे. त्याची आज चौकशी केली जाणार आहे.

जेसीबी मशीनचा व्यवहार फक्त भाडेतत्त्वावर झाला असल्याचा युक्तिवाद हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे ही आर्थिक फसवणूक म्हणता येणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले होते. यावर म्हाळुंगे पोलिसांनी शशांकचा जबाब न्यायालयाकडे सादर केला. मे 2024 मध्ये हा जबाब नोंदवण्यात आला होता. जेसीबी खरेदीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे शशांकने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Pune Crime News: पुण्यात चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावर चढला, युवकाचा उडी मारण्याचा प्रयत्न अन्...नेमकं प्रकरण काय?
पुण्यात चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावर चढला, युवकाचा उडी मारण्याचा प्रयत्न अन्...नेमकं प्रकरण काय?
SSC Exam Result: 10वीचा निकाल जाहीर होऊन 4 दिवस उलटले, अजूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बोर्डाकडून अद्याप ठोस उत्तर नाही
10वीचा निकाल जाहीर होऊन 4 दिवस उलटले, अजूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बोर्डाकडून अद्याप ठोस उत्तर नाही
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget