(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Indapur IAF Aircraft Crash : इंदापूरमधील कडबनवाडी गावातील शेतात शिकाऊ विमान कोसळले; पायलट भावना राठोड किरकोळ जखमी
IAF Aircraft Crash : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे.
Pune News: इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे. बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले.
हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बारहाते यांच्या शेतात कोसळले.
नक्की काय घडलं?
बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. याच विमानाचा शिकाऊ पायलट भाविका राठोड सराव करत होत्या. त्यानुसार सकळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र काहीच वेळानंतर तांत्रिक अडचण जाणवू लागली. अचानक विमानातील इंधन संपलं आणि विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात कोसळलं. बारहाते याचं हे शेत होतं. या अपघातात जखमी झालेल्या भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
ही दुर्घटना घडल्यावर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यावेळी शेजारील वस्तीतील तरुणांनी समाजभान दाखवत घटना स्थळी दाखल झाले. त्यांना वैमानिक दिसल्याने त्यांनी लगेच भाविका राठोड या तरुणीला विमानाच्या बाहेर काढलं. पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.