एक्स्प्लोर

Prashant Jagtap : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईन म्हणणारे प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला; चर्चेआधीच मनातलं सगळं सांगितलं

Prashant Jagtap : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा त्यांनी घेतला होता, त्यानंतर आज प्रशांत जगताप शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होताना दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचंही दिसून आलं. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी याबाबतच्य घोषणा केल्या होत्या. अशीच समीकरणे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात. मात्र, या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी ठाम विरोध दर्शवला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा त्यांनी घेतला होता, त्यानंतर आज प्रशांत जगताप शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Jagtap : मी शरद पवारांना आज एक अहवाल देणार

आज शरद पवारांनी प्रशांत जगताप यांना भेटीसाठी बोलवलं आहे. काही वेळात प्रशांत जगताप हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर मी राजीनामा देईन, राजकारणातून बाहेर पडेन असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. प्रशांत जगताप आणि शरद पवार यांच्या भेटीत काय होतं? ते पुणे राष्ट्रवादीसाठी महत्वाचं असणार आहे. भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मी दोन्ही पक्षात काम केलं आहे. मी शहरात कार्यकर्त्यांचं संघटन बांधलं आहे. शरद पवार हे आमचं श्रद्धास्थान आहेत, त्यांची साथ निभवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पुणेकर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला नक्की मतदान करतील. महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडत आहे. मी शरद पवारांना आज एक अहवाल देणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय होईल इतर कुठल्या पक्षांसोबत गेलो तर निवडणुकीत काय होईल याचा लेखाजोखा आज मी त्यांच्यासमोर मांडणार आहे, शरद पवार हे योग्य तो निर्णय घेतील, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये हीच इच्छा असल्याचंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील कॉल केला होता, शरद पवार योग्य निर्णय घेतील असंही त्यांनी पुढे म्हटलं होतं.

Prashant Jagtap : काय म्हणाले होते जगताप?

प्रशांत जगताप म्हणाले होते की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन.अजित पवार यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही शरद पवारांसोबत उभे राहिलो, अनेकांचा विरोध सहन केला, सरकारविरोधात आंदोलन केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही उत्तर दिलं. आणि आता निवडणुका तोंडावर आल्यावर एकत्र लढण्याचा विचार कसा काय? अजित पवारांना माहीत आहे. एकत्र लढलो तर पुण्यात त्यांची किती जागा येऊ शकतात. असे म्हणत प्रशांत जगताप यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget