Pooja Khedkar: पूजा खेडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांसह मसूरीतील चौकशीला गैरहजर, फोनही ऑफ, आता काय कारवाई होणार?
Pooja Khedkar: पूजा खेडकर मसूरीत ट्रेनिंग सेंटरने चौकशीसाठी दिलेल्या मुदतीत देखील पोहचली नाही. त्यानंतर तिला फोन लावण्यात आला मात्र, फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: राज्यासह आता देशभरात चर्चेत असलेली पूजा खेडकर आणि कुंटुबियांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेली पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) आता नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. तिला चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं. मात्र चौकशीआधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जातं आहे. पूजा खेडकर मसूरीत ट्रेनिंग सेंटरने दिलेल्या मुदतीत देखील पोहचली नाही. त्यामुळे आता तिच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) मसूरीत ट्रेनिंग सेंटरने चौकशीसाठी दिलेल्या मुदतीत देखील पोहचली नाही. त्यानंतर तिला फोन लावण्यात आला मात्र, फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मसूरीमध्ये चौकशीसाठी पूजा खेडकर गैरहजर राहिली होती. बनावट कागदपत्रे दिल्याने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीआधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल
ट्रेनिंग सुरू असताना आपल्या मागण्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरनी (IAS Pooja Khedkar) यूपीएससीला बनावट मेडिकल सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलं. तिचं राज्यातील प्रशिक्षण रद्द करण्यात आलं. पूजा खेडकरला पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं मात्र, त्याआधी ती नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ती चौकशीसाठी देखील मसूरीला न गेल्याने आता तिच्यावर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पूजा खेडकरच्या आई वडिलांचा घटस्फोट खोटा?
पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आई-वडिलांनी खोटा घटस्फोट घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिलीप खेडकर यांच्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठीच्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकरचा (Manorama Khedkar) पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. खेडकर कुटुंबीयांच्या मालमत्तांचा ताबा दिलीप खेडकर (Dilip Khedkar), मनोरमा खेडकरकडे संयुक्तपणे असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) फक्त यूपीएससी परीक्षेमध्ये फायदा व्हावा यासाठी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी घटस्फोट घेतला असल्याचा बनाव रचला का? याची चौकशी करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.
एकीकडे वादात सापडलेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) चौकशीआधीच नॉट रिचेबल झाली आहे. तर दुसरीकडे तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्यामुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.