एक्स्प्लोर

बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के; कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

बारावीचा बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. कोकण अव्वल, नागपूर तळाला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला आहे. तर 82.81 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. यंदाही मुलींची बाजी निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे. संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया काॅलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे. बारावीचा विभागनिहाय निकाल पुणे - 87.88 टक्के मुंबई - 83.85 टक्के नागपूर - 82.81 टक्के अमरावती - 87 टक्के लातूर - 86.08 टक्के नाशिक - 84.77 टक्के औरंगाबाद - 87.29 टक्के कोल्हापूर - 87.12 टक्के कोकण - 93.23टक्के शाखानिहाय निकाल कला - 76.45 टक्के वाणिज्य - 88.28 टक्के विज्ञान - 92.60 टक्के बारावी निकालाची वैशिष्ट्ये * कोकण अव्वल (93.23 टक्के), नागपूर तळाला (82.81) * 90.25 टक्क्यांसह विद्यार्थिनींची बाजी (यंदा 7.85 टक्के जास्त निकाल) * राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घट * iPad वर परीक्षा देणाऱ्या मुंबईतील दिव्यांग विद्यार्थिनीला 73 टक्के * दिव्यांगांच्या निकालात यंदा 1.18 टक्क्यांनी वाढ (यावर्षी 92.60 टक्के निकाल) कसा पाहाल निकाल? बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के; कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. याठिकाणी पाहता येणार निकाल? www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org www.maharshtraeducation.com
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yugandhara Bhonde : दीड वर्षांच्या लेकीला सोडून खडतर सैनिकी प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या ITBP मध्ये क्लास वन ऑफिसर!
दीड वर्षांच्या लेकीला सोडून खडतर सैनिकी प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या ITBP मध्ये क्लास वन ऑफिसर!
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं
धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं
पुणे विषारी दारु प्रकरण! जिथून विषारी दारुची विक्री झाली  तो दारु अड्डा नेस्तनाबूत करणार, पुढच्या 24 तासात कारवाई होणार
पुणे विषारी दारु प्रकरण! जिथून विषारी दारुची विक्री झाली  तो दारु अड्डा नेस्तनाबूत करणार, पुढच्या 24 तासात कारवाई होणार

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Embed widget