Holi Special Train : होळीला घरी जायचे, टेन्शन नका घेऊ; मध्य रेल्वेनं सुरु केल्या स्पेशल 90 गाड्या
Holi Special Train : होळीमुळे प्रवाशाची अतिरिक्त गर्दी लक्षात मध्य रेल्वेने स्पेशल गाड्या सुरु केल्या आहेत.
Holi Special Train : मध्य रेल्वेने यापूर्वीच मुंबई ते सुरत यादरम्यान सहा होळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान 34 होळी विशेष आणि नागपूर आणि मडगाव दरम्यान 10 हॉलिडे स्पेशल रेल्वे ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. होळीमुळे प्रवाशाची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर/मडगाव, पुणे - दानापूर/अजनी/करमळी आणि पनवेल - करमळी दरम्यान अतिरिक्त 34 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान सहा होळी विशेषची घोषणा केल्यामुळे, या वर्षी होळीसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वेची संख्या 90 इतकी झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 84 तर पूर्व मध्य रेल्वेच्या सहा रेल्वेंचा समावेश आहे.
34 होळी स्पेशल रेल्वे खालीलप्रमाणे असतील..
1. लोकमान्य टिळक टर्मिनस - समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (4 सेवा)
01043 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 2.3.2023 आणि 5.3. 2023 (2 फेऱ्या) रोजी 12.15 वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी 21.15 वाजता पोहोचेल.
01044 विशेष दि. 3.3.2023 आणि 6.3.2023 (2 फेऱ्या) रोजी समस्तीपूर येथून 23.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 07.40 वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.
संरचना: तीन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 4 द्वितीय श्रेणी आसन आणि 9 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
2. पुणे – दानापूर साप्ताहिक होळी विशेष (2 सेवा)
01123 विशेष गाडी दि. 4.3.2023 रोजी पुणे येथून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.
01124 विशेष दि. 6.3.2023 रोजी (1 फेरी) सकाळी 06.30 वाजता दानापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 18.45 वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 6 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन
3. पुणे - अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल (6 सेवा)
01443 विशेष दि. 28.2.2023 ते 14.3.2023 पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.50 वाजता अजनी येथे पोहोचेल.
01444 विशेष गाडी दि. 1.3.2023 ते 15.3.2023 पर्यंत दर बुधवारी अजनी येथून 19.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: 13 तृतीय वातानुकूलित, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
4. लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव साप्ताहिक विशेष (6 सेवा)
01459 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 26.2.2023 ते 12.3.2023 पर्यंत दर रविवारी 22.15 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्या दिवशी 10.30 वाजता पोहोचेल.
01460 विशेष मडगाव येथून दि. 27.2.2023 ते 13.3.2023 पर्यंत दर सोमवारी 11.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
5. पुणे - करमळी साप्ताहिक विशेष (6 सेवा)
01445 विशेष दि. 24.2.2023 ते 17.3.2023 पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून 17.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमळी येथे पोहोचेल.
01446 विशेष गाडी दि. 26.2.2023 ते 19.3.2023 पर्यंत दर रविवारी 09.20 वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी 23.35 वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
6. पनवेल - करमळी साप्ताहिक विशेष (8 सेवा)
01447 साप्ताहिक विशेष गाडी दि. 25.2.2023 ते 18.3.2023 पर्यंत दर शनिवारी 22.00 वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमळी येथे पोहोचेल.
01448 विशेष गाडी दि. 25.2.2023 ते 18.3.2023 पर्यंत दर शनिवारी 09.20 वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी 20.15 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.