Mohasin shaikh Murder : मोहसीन शेख हत्या प्रकरण; हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष मुक्तता
Mohasin shaikh Murder Case : 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Mohasin shaikh Murder : 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील (Murder Case) सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि अन्य 20 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
02 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. त्यावेळी फेसबुक आणि सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी धंनजय देसाईने त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर चिथावणीखोर भाषण दिल्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप होता.
मूळचा सोलापूरचा असलेला मोहसनी पुण्यात आय. टी. कंपनीत काम करत होता. मोहसीन दोन जूनला भाऊ आणि इतर मित्रांसह नमाज पढण्यासाठी हडपसर भागातील एका मशिदीत गेला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर टोपी होती. तेवढ्यात मोटर सायकलवरून काहीजण आले आणि त्यांनी मोहसीनवर हल्ला केला. मोहसीनवर हल्ला केलेल्या व्यक्ती हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं. कार्यकर्त्यांनी अचानक मोहसीन आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. त्यावेळी क्रिकेटच्या बॅटनं मोहसीनला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मोहसीन गंभीर जखमी झाला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र, पुढे उज्जवल निकम यांनी अचानक या प्रकरणातून विशेष सरकारी वकील म्हणून काम करणं थांबवलं होतं.