हरिहरेश्वरमध्ये पिंपरीच्या मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; कडाक्याचं भांडण, हॉटेल मालकाच्या बहिणीला कारखाली चिरडलं
पुण्यावरून कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला.
![हरिहरेश्वरमध्ये पिंपरीच्या मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; कडाक्याचं भांडण, हॉटेल मालकाच्या बहिणीला कारखाली चिरडलं Harihareshwar drunk tourists from Pimpri denied a room got angry hotel owner sister crushed under car हरिहरेश्वरमध्ये पिंपरीच्या मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; कडाक्याचं भांडण, हॉटेल मालकाच्या बहिणीला कारखाली चिरडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/21/44597adce50a5a71f3514dff77f514c7172948107911489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रायगड : रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली. यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच थांबले नाहीत, अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडलं. या घटनेतील एक आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली.
पुण्यावरून कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच न थांबता अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर हे घटनेवरून पलायन करत असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील तीन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात सापडले असून उर्वरित पर्यटकांनी इथून पळ काढल्याची बाब समोर आली आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना
श्रीवर्धनमधील पोलीस या आरोपींचा आता शोध घेत आहेत. मध्यरात्री एक वाजून 30 मिनिटांनी घडलेली ही घटना सर्वांना हादरवून सोडणारी आहे. शनिवार - रविवार सुट्टी असल्याने हे तरूण आले होते. दारुच्या नशेत पर्यटकांनी केलेला गोंधळामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी तीन जणांना तब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
आरोपींची नावे खालील प्रमाणे
- आकाश उपटकर
- नीरज उपटकर
- आकाश गावडे
- आशिष सोनावणे
- अनिल माज
- विकी सिंग
- सलीम नागुर
- सचिन जमादार
- आदिल शेख
- इराप्पा धोतरे
- सचिन टिल्लू
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)