Pune Crime News: 35 वार करुन खून झालेल्या अक्षयच्या आरोपींना फाशी द्या; समर्थ पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरीकांचा हल्लाबोल
त्यानंतर आज नाना पेठ परिसरातील नागरीकांनी समर्थ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. या आरोपीला अटक करा, अशी मागणी संतापलेल्या नागरीकांकडून करण्यात आली आहे.
Pune Crime News: पुण्याच्या (Pune Crime) मध्यवर्ती भागात पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. नाना पेठेतील नवा वाडा या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून अक्षय वल्लाळ या तरुणाचा चाकू भोकसून खून करण्यात आला होता. त्यानंतर आज नाना पेठ परिसरातील नागरीकांनी समर्थ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. या आरोपीला फाशी द्या, अशी मागणी संतापलेल्या नागरीकांकडून करण्यात आली आहे.
महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नवा वाडा, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33, रा. नाना वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नुसता गुन्हा दाखल करु नका, असे आरोपी अनेक आहेत जे आजही खुलेआम फिरत आहेत. या दोघांना फाशी द्या या मागणीसाठी अक्षयच्या ओळखीच्या महिलांनी ठाण्यात गर्दी केली.
अक्षय ज्या भागात राहिला होता त्या भागात अक्षयचं वर्चस्व होतं आणि हेच या दोघांच्या डोळ्यात खूपच होतं. हा राग मनात धरून त्या दोघांनी अक्षयचा काटा काढायचा ठरवलं. अक्षयची काही दिवसांपूर्वी दोघांसोबत याच गोष्टीवरून वाद विवाद झाले होते. याचाच राग मनात धरून त्या दोघांनी सोमवारी मध्यरात्री नवा वाडा परिसरातील एका इस्त्रीच्या दुकानाजवळ अक्षयवर चाकूने वार केले. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निघृण खून केला. अक्षयवर आरोपींनी 35 वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही जणांवर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण
अक्षयचा भर रस्त्यात चाकुने वार करुन खून करण्यात आला त्यामुळे कालपासून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आरोपींची दहशत संपवायला हवी. या खूनामागे मुंबईच्या गॅंगचा हात आहे. त्यामुळे पून्हा अशा प्रकराच्या घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून आरोपींना कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी शेकडो नागरीक जमले आहेत.