एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णांवरती 'या' रूग्णालयात होणार मोफत उपचार, अजित पवारांनी दिली माहिती

Guillain Barre Syndrome: पुण्यात या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत, नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी असं आवाहन आज अजित पवारांनी केलं आहे.

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या 73 वरती पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, आणि या आजारावरती होणारा मोठा खर्च लक्षात घेता, पुणेकरांनी या आजारावरती मोफत उपचार केले जावे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य केली असल्याची माहिती आहे. आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज याबाबतची माहिती दिली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण झालं, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना सांगितलं की, गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) आजार वाढू लागला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णावर पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत, नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी असं आवाहन आज अजित पवारांनी केलं आहे. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आपला देश कधी कोणासमोर झुकला नाही, अनेकांनी स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिले. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 75 वर्षात प्रत्येक संकटाला समोर जाणारे काम देशवासीयांनी केलं, संपूर्ण देश एक आहे ही, भावना आपण मजबूत केली. हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आहे. आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला आहे. केंद्र सरकारने काल पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार मिळालेल्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.  

आर्थिक ताण मिळू नये म्हणून प्रशासनाला सूचना 

आज पुणेकरांना एक गोष्ट सांगायची आहे, शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णांची वाढ होते आहे. कमला नेहरू पार्कमध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे, आर्थिक ताण मिळू नये म्हणून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराचे नवीन संकट आपल्या आले आहे, पण घाबरून जाऊ नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचं सर्वांचे त्यावर लक्ष आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.  

गुलेन बॅरी सिंड्रोम झालेल्या एका रूग्णाचा मृत्यू

पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी (ता. 25) मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Embed widget