(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं अर्पण
पुण्यातील गाडगीळ ज्वेलर्समध्ये हे उपरणं बनवण्यात आलं आहे. या उपरणाची कलाकुसर पूर्ण होण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला.
पुणे : पुण्यातील दगडूशेठ गणपती हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. गुढीपाडव्यानिमित्त आज दगडूशेठ गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं अर्पण करण्यात आलं आहे. व्यंकटेश हचरिजचे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे 3 किलोचे सोन्याचे उपरणं दगडूशेठ गणपतीला अर्पण केलं.
विविध आभूषणांनी आणि सोन्याच्या पोशाखात सजलेली दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती डोळ्यात साठवण्यासाठी भाविक आतुर असतात. बाप्पाच्या पोशाखात सोवळं, पगडी यांचा समावेश आहे. उपरण्याची कमतरता होती पण आज पूर्ण झाली आहे. आता दगडूशेठ गणपतीकडे पोशाख आणि दागिने मिळून एकूण 100 किलोचे दागिणे झाले आहेत.
आज सकाळी विधीवत पूजा करुन हे उपरणं बाप्पांना घालण्यात आलं. पुण्यातील गाडगीळ ज्वेलर्समध्ये हे उपरणं बनवण्यात आलं आहे. या उपरणाची कलाकुसर पूर्ण होण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला. पूर्णपणे सोन्याने बनवलेल्या या उपरण्यात बारीक सोन्याच्या धाग्यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच त्याच्या पदराला सुंदर नक्षीकामही करण्यात आलं आहे.