एक्स्प्लोर

... तर पुण्यासारखी दुर्घटना झाली नसती, कल्याणीनगर अपघात प्रकरणावर राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिक्रिया 

Kalyani Nagar Accident : कल्याणीनगर अपघातावर राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्पवयीन मुलगा जर एनसीसीमध्ये असता तर अशी दुर्घटना झालीच नसती, असं वक्तव्य रमेश बैस यांनी केले आहे. 

Ramesh Bais On Pune Kalyani Nagar Accident : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. पोलिस, डॉक्टरांनाही याप्रकरणी निलंबित करण्यात आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार स्वत: लक्ष देऊन आहेत. तर विरोधाकांकडून याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. आता कल्याणीनगर अपघातावर राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्पवयीन मुलगा जर एनसीसीमध्ये असता तर अशी दुर्घटना झालीच नसती, असं वक्तव्य रमेश बैस यांनी केले आहे. 

एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल.  पुणे येथील युवकाला एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून दुर्घटना घडली नसती, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्र' समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया देत सर्वांनाच एनसीसी अनिवार्य करावी, असं म्हटलेय. 

राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या 'प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात' राज्यपालांच्या हस्ते  महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.  आपण स्वतः एनसीसी कॅडेट होतो असे  नमूद करून देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व बाणवले, तर देश अतिशय वेगाने प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.  महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने आजपर्यंत 23 वेळा पंतप्रधानांचे ध्वजनिशान जिंकले तसेच 8 वेळा महाराष्ट्र संचालनालय उपविजेते ठरले आहे, याबद्दल राज्यपालांनी राज्यातील एनसीसीच्या सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण 1.17 लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. पुढील 10 वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या 1.85 लाख इतकी वाढविली जाणार आहे, हे कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी सांगितले. एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले. या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, शासनाचे अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन्  काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंट तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंट तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सCM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंतTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन्  काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंट तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंट तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
Embed widget