एक्स्प्लोर

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!

Girish Mahajan on Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचून एक मोठी दुर्घटना घडली आहे.

Girish Mahajan on Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमध्ये (Garbage Depot) मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचून एक मोठी दुर्घटना घडली आहे. हा ढिगारा थेट 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच बचाव कार्याचा आढावा घेत त्यांनी परिस्थितीची माहिती दिली आहे.  

या दुर्घटनेनंतर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याचा डोंगर खचला आहे. या इमारतीमध्ये जवळपास 22 लोक अडकले होते. त्यापैकी 5 लोक वरच्या बाजूला होते, ते तात्काळ बाहेर पडले. बाकीचे लोक आत अडकले होते, त्यापैकी 6 ते 7 लोकांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढले आहे. आमच्या टीमचा आतल्या लोकांशी संपर्क सुरू आहे.

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...

मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की, "अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. जास्त पाऊस पडल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये आल्याने इमारत पडली. अत्यंत कमी कालावधीत 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत 6 जणांना बाहेर काढले आहे. तीन लोकांना आतमध्ये जाऊन चहा आणि बिस्किटे दिली आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांना सध्या बाहेर काढता येत नाहीये. त्यांचे पाय पिलरखाली अडकलेले आहेत. ते दिसत असूनसुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाहीये. आणखी जवळपास 12 जण आत असण्याची शक्यता असून, त्यातील तीन जणांपर्यंत आमचा संपर्क झाला आहे. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल (Fire Brigade), राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), 'पीडीआरएफ' (PDRF) आणि देहूरोड येथील सैन्य दलाच्या तुकड्या (Army Troops) युद्धपातळीवर काम करत आहेत. ढिगारा बाजूला करण्यासाठी पोकलेन मशीनची मदत घेतली जात आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबला छिद्र पाडून जवान आत उतरले असून अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget