एक्स्प्लोर

Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

Ketan Agarwal and Siya Goyal: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलचा क्राईम वेबसिरीज पाहून रिसर्च, गुगलवरील सगळी माहिती धुंडाळली, अखेर लोहगडावरुन ढकललं

Siya Goyal Ketan Agrawal case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याविषयी आता एक नवीन माहिती समोर आली आहे. सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहे. सियाच्या चौकशीदरम्यान पोलिसांना ती फक्त 20 वर्षांची असली तरी ती एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा विचार करु शकते, हे लक्षात आले आहे. कारण सियाने केतनला (Ketan Agarwal) लोहगडावरुन (Lohagad Fort) ढकलण्यापूर्वी गुगलवरुन अनेक गुन्हेगारी प्रकरणाची माहिती घेतली होती. हत्या कशी करायची, पकडले गेल्यास काय करायचे, याचा नीट सखोल अभ्यास केला होता. यासाठी तिने गुगलवरील माहिती, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिले होते. (Pune Crime news)

सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने गुगलवर चार प्रश्न विचारुन माहिती शोधली होती. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत मारले जाते का? हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कशाप्रकारे चौकशी करतात? सोनम रघुवंशीला पोलिसांनी पकडल्यानंतर तिला चौकशीत कोणते प्रश्न विचारले होते? सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयात जामीन कसा मिळाला?, या प्रश्नांची उत्तरे सियाने सर्च केल्याचे समोर आले आहे. जेणेकरुन केतनला मारल्यानंतर पोलिसांनी पकडले गेल्यास काय बोलायचे, कायदेशीरदृष्ट्या स्वत:च्या बचावासाठी काय बोलायचे, याची तयारी सियाने अगोदरच करुन ठेवली होती. यावरुन सियाने हा सगळा हत्येचा कट थंड डोक्याने आखल्याचे दिसत आहे. 

Pune Crime Lohagad Case: चेतन अन् सिया गोयलने लॉजवर लग्न केलं, कपाळावर कुंकू भरलं

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअॅप चॅट, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या तपासातून हा महत्त्वाचा धागा हाती लागल्याचे समजते.

एका लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळावर कुंकू लावलं भरला. तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. प्राथमिक तपासात व्हॉट्सअॅपवरील संभाषणे, एकमेकांना केलेले संदेश, छायाचित्रे आणि काही दस्तऐवजांमधून दोघांनी गुप्तपणे विवाह केल्याचे संकेत मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस संबंधित कागदपत्रे, विवाहस्थळ, साक्षीदार आणि अन्य पुरावे गोळा करत आहेत.

आणखी वाचा

Siya Goyal Pune Crime: 20 वर्षांच्या सिया गोयलचं प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही हादरले, कसलेल्या वकिलालाही लाजवेल असा अभ्यास, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
Embed widget