एक्स्प्लोर

Pune Bypoll election : Pune Bypoll election : काय सांगता? राहुल कलाटे यांच्यावर कोटींचे कर्ज

Pune Bypoll : जनता आणि समर्थकांच्या पाठिंब्यामुळे बंडखोरी करतो असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरीदेखील त्यांच्याकडे त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? आणि त्यांच्यावर कर्ज किती आहे?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Pune Bypoll election :  चिंचवडची पोटनिवडणूक (pune bypoll election)जाहीर झाल्यापासून राहुल कलाटेंची जोरदार चर्चा सुरु आहे आणि आता त्यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यभर चिंचवडची पोटनिवडणूक गाजणार असल्याचं चिन्ह आहे. त्यांच्याविरोधात बॅनरबाजी (Rahul kalate)  करण्यात आली आहे शिवाय त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीदेखील करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. ते आता चिंचवडमधून 'शिट्टी' या चिन्हावर चिंचवड काबीज करायला सज्ज झाले आहे. जनता आणि समर्थकांच्या पाठिंब्यामुळे बंडखोरी करतो असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरीदेखील त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याइतकं आर्थिक पाठबळ आहे का?, अशा चर्चा आहे. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? आणि त्यांच्यावर कर्ज किती आहे?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

राहुल कलाटे यांच्यावर किती कोटींचं कर्ज आहे?

राहुल कलाटे यांच्याकडे 61 कोटींची संपत्ती आहे. त्यावर 1 कोटी 10 लाख 7 हजार 248 रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. राहुल कलाटे यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. कलाटे कुटुंबाची जंगम मालमत्ता एक कोटी 40 लाख 20 हजार 593  आहे. कलाटे यांची स्थावर मालमत्ता 60 कोटी तीन लाख 76 हजार 319 रुपये, तर जंगम स्थावर मालमत्ता 61 कोटी 43 लाख 96 हजार 912 रुपये आहे. कलाटे यांच्यावर 1 कोटी 10 लाख 7 हजार 248 रुपयांचे कर्ज आहे. कलाटे यांनी शेती  आणि व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन दाखवले असून त्यांची पत्नी गृहिणी आहे.

राहुल कलाटे यांच्याकडे किती मालमत्ता आहे?

कलाटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी तालुक्यात शेतजमीन आहे, तर रहाटणी, वाकडमध्ये फ्लॅट आहे. कलाटे यांच्याकडे 92 हजार 640 रुपये, तर पत्नीकडे 53 हजार 750 रुपये रोख आहेत. कलाटे यांच्याकडे 15 तोळे सोने, तर त्यांच्या पत्नीकडे 52 तोळे सोनं आणि दोन किलो चांदी आहे. कलाटे यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाटे यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 56 लाख 73 हजार 940 रुपये उत्पन्न दाखवले आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 5 लाख 66 हजार 330 रुपये आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात कोणीही उमेदवार उभं राहण्याची हिंम्मत दाखवत नसताना 2019च्या निवडणुकीत राहुल कलाटे हे त्यांच्याविरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना लाखभर मतं मिळाले होते. त्याच जोरावर यावेळी त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget