एक्स्प्लोर

Nilesh Ghaywal: आधी अहिल्यानगरचा पत्ता, मग नावाच्या स्पेलिंगमध्ये हेराफेरी, निलेश घायवळच्या पासपोर्टची चकीत करणारी कहाणी!

Nilesh Ghaywal: नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत २३ डिसेंबर २०१९ रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता.

पुणे: पुण्यातील गुंड निलेश बन्सीलाल घायवाल (Nilesh Ghaywal), ज्यावर अनेक गुन्हेगारी खटले सुरू आहेत, त्याने अहिल्यानगर पोलिसांकडून निगेटिव्ह अ‍ॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळूनही बेकायदेशीरपणे पासपोर्ट मिळवला आणि तो लंडनला (London) पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. पण कुख्यात गुंड निलेश घायवळने पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. यासाठी त्याने नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत २३ डिसेंबर २०१९ रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता.

Nilesh Ghaywal : कहाणी निलेश घायवळच्या पासपोर्टची

निलेश घायवळवर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरायचं ठरवलं. त्याने २३ डिसेंबर २०१९ ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला‌. त्यासाठी त्याने नावात देखील बदल केला. निलेशने त्याच नाव घायवळ ऐवजी गायवळ असं अर्जावर नमुद केलं. म्हणजे Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटा पत्ता त्याने नमुद केला. त्याने गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड ४१४००१ असा पत्ता दिला. 

Nilesh Ghaywal : Not available एवढाच अभिप्राय पाठवला

पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळचा अर्ज तपासणीसाठी कोतवाली पोलीसांकडे पाठवण्यात आला असता कोतवाली पोलीसांच्या मते त्यांनी घायवळने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांना निलेश घायवळ त्याठिकाणी रहात असल्याचे आढळून आले नाही. त्याचबरोबर निलेश घायवळ सोबत त्यांचा संपर्क देखील झाला नाही. मात्र आश्चर्य म्हणजे कोतवाली पोलीसांनी पासपोर्ट कार्यालयाला Not available एवढाच अभिप्राय पाठवला. त्याहुन आश्चर्य म्हणजे पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन १६ जानेवारी २०२० ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर २०२१ मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हिजा मिळवून युरोपला फिरायला गेला‌.

Nilesh Ghaywal: ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर 

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने 'तत्काळ' पासपोर्ट मिळविले आहे. या पासपोर्ट  प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. एवढे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट, व्हिसा कसा मिळाला, याचा शोध पुणे पोलीस घेत आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी 'लूक आऊट' नोटीस बजावली आहे.(Nilesh Ghaywal)

Nilesh Ghaywal: पासपोर्ट कसा जारी करण्यात आला याची चौकशी सुरू

अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे म्हणाले की, घायवाळनी २०१९ मध्ये पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यांच्या पासपोर्ट अर्जात त्यांनी 'गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड, अहमदनगर (आता अहिल्यानगर असे नाव देण्यात आले आहे)' येथील रहिवासी असल्याचे नमूद केले होते. घार्गे म्हणाले की, पोलिसांना २३ डिसेंबर २०१९ रोजी पासपोर्ट पडताळणी प्रकरण ऑनलाइन मिळाले होते. त्यानुसार, पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पासपोर्टवर नमूद केलेल्या पत्त्यावर पडताळणी केली, परंतु अर्जदार (घायवाळ) घटनास्थळी आढळला नाही. त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणावर '(not available)तो उपलब्ध नाही' असा शेरा दिला आणि १६ जानेवारी २०२० रोजी तो पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला, असे घार्गे म्हणाले. घायवाळच्या अर्जावर पोलिसांनी 'उपलब्ध नाही' असा शेरा दिला असूनही, जो निगेटिव्ह अ‍ॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मानला जातो, तो पासपोर्ट कसा जारी करण्यात आला याची चौकशी सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Embed widget