एक्स्प्लोर

Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या

सलग चौथ्या दिवशी झालेल्या गोळीबाराने पुणं हादरलं आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर  गोळीबार झाल्यानंतर आता येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे.

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत  (Firing) चांगलीच वाढ झाली आहे. त्यात गोळीबाराच्या (Pune Crime News) घटनादेखील वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या गोळीबाराने पुणं हादरलं आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर  गोळीबार झाल्यानंतर आता येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा दोघांवर करण्यात  गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील  अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. दोघांमध्येही जुना वाद होता. त्यातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचंदेखील पोलीस तपासात समोर आलं आहे. 

सलग चौथ्या दिवशी गोळीबार

पुण्यात जंगली महाराज रोड आणि हडपसरमध्ये शेवाळवाडी परिसरात गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या.बांधकाम व्यवसायिकावर फायरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यवसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर स्विगीसारखे वस्त्र परिधान करून हेल्मेट घातले होते. त्या दोघांनी पिस्टल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर न झाल्याने दोन आरोपींनी पुढे पळ काढला होता. शेवाळवाडीत दोन सैनिकांमध्ये वाद झाल्याने भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला होता.

गोळीबाराच्या घटना कधी थांबणार?


पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे. मागील मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्षृल्लक वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Baramati Crime News : कोयता हल्ल्यानं बारामती हादरलं! कोयता हल्ल्यात कॉलेज तरुणाची हत्या, कारण ठरलंं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget