![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल
पुणे जिल्हाधिकारी यांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांना पालन करावयाचे नियम प्रसारित केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशांव्यतिरीक्त वेगळे आदेश काढण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमांचं भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
![पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल Filed a case against the Housing Society for violating the Collectors order in pune पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/29045303/Pune.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी औंध येथील एका हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीमध्ये नव्याने राहण्यासाठी आलेल्या कुटुंबाला मेडिकल सर्टिफिकेट शिवाय प्रवेश करता येणार नसल्याचं सोसायटीच्या सेक्रेटरींनी सांगितलं होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन निलय सोसायटीमध्ये सुधीर मेस्सी हे आपल्या कुटुंबियांसह नव्याने राहण्यास आले होते. त्यांचं सामना आणि ते सामान वाहण्यासाठी कामगारही त्यांच्या सोबत होते. मात्र सोसायटीचे सेक्रेटरी सुनील शिवतारे यांनी मेस्सी यांना व त्यांच्या कुटुंबियांना सोसायटीच्या गेटवरच अडवलं आणि मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली. तसेच मेडिकल सर्टिफिकेट शिवाय सोसायटीमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं सांगितलं.
पुणे जिल्हाधिकारी यांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांना पालन करावयाचे नियम प्रसारित केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशांव्यतिरीक्त वेगळे आदेश काढण्यास सक्त मनाई केलेली आहे. असं असतानाही सोसायटीच्या सचिवांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता सुधीर मेस्सी व त्यांच्या कुटुंबियांना सोसायटीमध्ये प्रवेशा करता मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक असल्याचा परस्पर आदेश काढला आणि जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचा भंग केला. त्यामुळे सोसायटीचे सेक्रेटरी सुनील शिवतारे यांचे विरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी स्वत:चे निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येतील, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. यामुळे पुणे शहराच्या सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी संबधित सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
- Corona Update | सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्ण, आज राज्यात 5493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- बारामतीत मुलगी झाली म्हणून नवऱ्याची महिलेला रुग्णालयात शिवीगाळ करत मारहाण!
- तरुणाने ऑनलाईन 'रमी गेम'मध्ये उडवले वडिलांचे साडेदहा लाख रुपये; सायबर पोलिसांमुळे फुटलं बिंग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)