तरुणाने ऑनलाईन 'रमी गेम'मध्ये उडवले वडिलांचे साडेदहा लाख रुपये; सायबर पोलिसांमुळे फुटलं बिंग
नाशिक मधील एका तरुणाने ऑनलाईन गेममध्ये वडिलांच्या बँक खात्यातील साडेदहा लाख रुपये उडवले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने स्वतः सायबर पोलीस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन गंडा घातल्याची तक्रार केली. सायबर पोलिसांच्या तांत्रिक विभागाने तपास सुरू केला आणि सुरुवातीला पोलिसांनाच धक्का बसला.
नाशिक : ऑनलाइन गंडा घातल्याची खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या मुलाचे बिंग सायबर पोलिसांमुळे फुटले. अडीच महिन्यात वडिलांच्या खात्यातील 10 लाख 64 हजार रुपये ऑनलाइन रमीमध्ये उडविल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात उघडीकस आलं आहे. या घटनेने कुटुंबीयांना धक्का तर बसलाच शिवाय पोलीसही अवाक झालेत. कुटुंबीयांच्या ईच्छेनुसार समज देऊन मुलाला सोडून देण्यात आले. मात्र, या प्रकणामुळे पोलिसांनी आपला मोर्चा फसव्या ऑनलाइन गेमकडे वळविला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सारेच घरी होते. याच कालावधीत मोबाइल इंटरनेटचा वापर वाढला. त्यामुळेच ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे देखील घडले. काही तरुण फसव्या ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकले. जिथे लॉकडाऊनच्या काळत हाताला रोजगार नव्हता. त्यामुळे काही नागरिक एक एक पैसा कमीविण्यासाठीही आटापिटा करत होते. तिथेच नाशिकच्या एका पित्याच्या बँक खात्यातील 10 लाख 64 हजार रुपये लंपास झालेत. कालावधी होता 8 मार्च ते 25 मे म्हणजे ऐन लॉकडाऊनचा. 25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे सारे व्यवयहर ठप्प झाले होते. त्यामुळे या कालावधीत बँकेच्या खात्यातून पैसे गायब कसे झाले हा प्रश्न होता. जमिनीच्या एका व्यवहारातून पैसे मिळाले होते. मात्र, तेच पैसे गेल्याने पित्याच्या पाया खालची वाळू सरकली. अखेर त्यांच्या 24 वर्षीय मुलाने नाशिकचे सायबर पोलीस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन गंडा घातल्याची तक्रार केली.
औरंगाबाद येथील उद्योजकांचे फेसबुक अकाउंट हॅक, 214 जणांना मागितले 15 हजार रुपये
रमी गेम मध्ये उडवले साडेदहा लाख रुपये या घटनेत कोणीतरी पैसे काढल्याचं नमूद करण्यात आलं. रक्कम मोठी असल्यानं पोलिसानी तत्काळ दखल घेतली. सायबर पोलिसांच्या तांत्रिक विभागाने तपास सुरू केला आणि सुरुवातीला पोलिसांनाच धक्का बसला. कारण ज्याने फिर्याद दिली होती त्यानेच ऑनलाइन रमी खेळात पैसे उडविल्याचं निदर्शनास आलं. त्याच्या मोबाइलमध्ये 2/3 रमी खेळाचे अॅप्लिकेशन आढळून आले. मुलाचा मोबाइल नबर वडिलांच्या बँक खात्याला लिंक असल्याने वडिलांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान सोसावे लागले.
पोलिसांचा ऑनलाईन गेमकडे मोर्चा
नाशिक पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांची टीम तपास करत असताना त्यांची तपासाची दिशा आता ऑनलाइन फसव्या गेमकडे वळाली आहे. ऑनलाइन अॅप्लिकेशन कोणते खरे कोणते खोटे, कोण कायदेशीर आणि कोण बेकयदेशीर काम करत आहे याकडे पोलिसांनी लक्ष वेधल आहे. दोन अडीच महिन्यात साडेदहा लाख रुपयांचा एका व्यक्तीला भुर्दंड बसत असेल तर ऑनलाईन गेम खेळणाऱ्याची संख्या लक्षात घेता ही उलाढाल कैक कोटींची असल्याने त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. यात जो दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाणार आहे. ऑनलाइन गेम अनेकांचा आकर्षित करत असतात. मात्र, या जाळ्यात अडकण्याआधी प्रत्येकानं त्याबाबत माहिती आणि खबरदारी घेतली पाहिजे. पालकांनीही आपला मुलगा काय करतोय याबाबत लक्ष दिले तर असे प्रकार टाळता येऊ शकतात.
India China Dispute | चीनकडून गेल्या 4-5 दिवसांपासून भारतावर सायबर अटॅक