Guillain Barre Syndrome: चिंता वाढली! पुण्यात जीबीएसचा आणखी एक बळी; राज्यातील मृतांची संख्या 'चार'वरती
Guillain Barre Syndrome: पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला झाल्याने आता चिंता वाढली आहे.

पुणे: पुण्यासह राज्याची चिंता वाढली आहे. पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात जीबीएस बाधित रुग्णाचा तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नांदेडगाव परिसरातील 65 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या रूग्णावरती मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित आहेत, त्यातील हा एक रुग्ण होता. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित रुग्णाचा मृत्यू झाला झाल्याने आता चिंता वाढली आहे. तर पुणे शहरामध्ये नांदेडगाव, सिंहगड रस्ता परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
नांदेड गावातली नागरिकाला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात उचार सुरु होते. प्रकृती अजून खराब झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक मृत्यू
पुण्यातून सोलापुरला आपल्या गावी गेलेल्या एका जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुण्यातील सिंहगड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत महिला रूग्ण कॅन्सरग्रस्त होती. 15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. उपचारांच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. तर काल (गुरूवारी, ता- 30) सकाळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण दगावला आहे. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21 जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता. गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. शहरात आत्तापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळले आहेत, पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा पहिला बळी ठरला आहे.
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित अन्न पाण्यामुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काय काळजी घ्यावी?
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
