एक्स्प्लोर

पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी

जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे.

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या (Accident) घटनांत वाढ झालेली दिसून येत आहे. अपघाताच्या बातम्या कमी होताना दिसत नाही, याउलट विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्याचेच वृत्त झळकत आहे. त्यामध्ये, प्रवाशांची लाडकी असलेल्या लालपरीचाही नंबर दिसून येतो. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं ब्रीद घेऊन लालपरी रस्त्यावर धावते. मात्र, गेल्या काही दिवसांत एसटी बसच्या (Bus) अपघातांच्या घटना घडत आहेत. अनेकदा बसची झालेली दूरवस्थाच या अपघाताला कारणीभूत असल्याचं प्रवाशांकडून व चालकांकडून सांगण्यात येत असतं. आता, पुणे (pune) जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 2 जण ठार झाले असून 15 प्रवासी जखमी आहेत. तर, नालासोपाऱ्यातही टँकर व ऑटोरिक्षाचा अपघात झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला. या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर, कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे. 

टँकरची रिक्षाला धडक, चहामुळे वाचला जीव

नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे एका भरधाव ऑईल टँकरने रिक्षाला जोरदार धडक देत, पाच दुकानांच्या शेडलालाही ठोक्कर दिली.त्यानंतर, हा टँकर जवळील वीजेच्या खांबालाही धडकला आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक चहा पिण्यासाठी बाहेर गेल्यामुळे सुदैवाने वाचला. दरम्यान, या धडकेत रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून वीजीचे पोल पूर्णपणे  वाकला गेला आहे. या भीषण अपघातानंतर नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पेल्हार पोलसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी फरार, शिंदे म्हणाले...

4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
Embed widget