एक्स्प्लोर

एका एकरातील कोथिंबिरीच्या विक्रीतून तब्बल साडेचार लाख रुपये, बारामतीमधील शेतकऱ्यांची छप्पर फाड़ कमाई

बारामतीमधील वाणेवाडी इथले शेतकरी अविनाश जगताप यांनी एक एकरवर लावलेली कोथिंबीर व्यापाऱ्याने तब्बल साडेचार लाख रुपयांना खरेदी केली. त्यांना कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च आला होता.

बारामती : बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावांमध्ये आणि परिसरात कोथिंबिरीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतमालाचे दर हे चांगलेच भडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका पेंडीला 40 ते 45 रुपये मोजावे लागत आहेत, अशातच बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील शेतकरी अविनाश जगताप यांनी एक एकरवर लावलेली कोथिंबीर व्यापाऱ्याने तब्बल साडेचार लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्यांना कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च आला. तर त्यांना एकरी नफा हा सरासरी चार लाख रुपये मिळाला आहे.

रेन पाईपद्वारे पाण्याचे नियोजन उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात. जगताप यांनी लागवड करताना संभाव्य धोका ओळखून रेन पाईपद्वारे या कोथिंबिरीला पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबिरीवर शॉवरसारखे पाणी पडत राहिल्याने पीक जोमात आल्याचे जगताप यांचे म्हणणे आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावामुळे येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. मात्र ऊस तोडून गेल्यानंतर राहिलेल्या शेतात येथील शेतकरी कोथिंबीरीची लागवड तसेच तरकारी करतात. मुबलक पाणी असल्यामुळे कोथिंबीरचे पीक जोमात येते.

एका एकरातील कोथिंबिरीच्या विक्रीतून तब्बल साडेचार लाख रुपये, बारामतीमधील शेतकऱ्यांची छप्पर फाड़ कमाई

एक महिन्यात 50 लाखांची उलाढाल बारामती तालुक्यातील मुरुम आणि वाणेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकात या वेळी तब्बल 50 ते 55 लाख रुपये कमावले आहेत. ही बाब सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी असली तरी पण खरी आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तरकारी पिकाला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. यात कोथिंबीर पिकाने जादा भाव खाल्ला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या जुडीला तब्बल 40 ते 45 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत आहेत.

एका एकरातील कोथिंबिरीच्या विक्रीतून तब्बल साडेचार लाख रुपये, बारामतीमधील शेतकऱ्यांची छप्पर फाड़ कमाई

वाणेवाडी, मुरुम आणि मळशी या तीन गावातील शेतकऱ्यांनी एकूण 27 एकर कोथिंबिरीतून तब्बल 50 लाख रुपये कमावले आहेत. हा आकडा सर्वांसाठी चक्रावणारा आहे. गेल्या पाच वर्षातील कोथिंबिरीचा हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारी आणि शेतकारी सांगत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून तरकारी पिकाला दर नव्हते, मात्र आता कोथिंबिरीच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget