Nirmala Sitaraman : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : सीतारमण
केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा गतीमान करा असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी दिले आहेत.
Nirmala Sitaraman : केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा गतीमान करा असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitaraman) यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सौरपंप वितरण, सौर पॅनेलद्वारे ऊर्जानिर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देणारी प्रधानमंत्री कुसुम योजना प्रभावीपणे राबवावी असेही त्या म्हणाल्या. सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पुणे (Pune) जिल्ह्याची केंद्र पुरस्कृत योजनांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
व्यवसायांसाठी करण्यात येणाऱ्या कर्ज वितरणा संदर्भातही घेतला आढावा
केंद्र पुरस्कृत योजनांचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर श्रीमती सीतारामण प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्राच्या योजना प्रभावी राबवण्याचे निर्देश सीतारमण यांनी दिली. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची क्षमता पाहता अधिकाधिक योजनांचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर जाळ्याने गतीमान इंटरनेंट सेवा पुरवण्याच्या भारत नेट योजनेला गती द्यावी असेही त्या म्हणाल्या. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेताना या योजनेंतर्गत आता केवळ शेतकरीच नाही तर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायांचाही कर्ज पुरवठ्यासाठी समावेश केलेला आहे. त्यानुसार कर्जवितरण होते का अशी विचारणा करुन सीतारामण यांनी यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोस्ट विभागाकडील प्रधानमंत्री जन विमा योजनेप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विमानतळ यांच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन, महापारेषण, महावितरण, डाक विभाग, बीएसएनएल, कृषी, कौशल्य विकास आदी विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदी विषयक सादरीकरण देखील यावेळी केले. भाजपच्या मिशन बारामती (Mission Baramati) या कार्यक्रमांतर्गत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौरा करत आहेत. यावेळी त्या बैठका घेऊन मतदासंघातील जनतेशी संवाद साधत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Niramala sitaraman : पुण्यातील वारजेमध्ये निर्मला सीतारमण यांचा ताफा अडवला, कार्यकर्ते ताब्यात
- Nirmala Sitaraman in Pune : सगळ्या पुणेकरांना... निर्मला सीतारमण यांनी केली मराठीतून भाषणाला सुरुवात, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट