एक्स्प्लोर

Ajit Pawar: नियमांचा भंग करत EVM रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा? जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडुन निवडणुक आयोगाच्या नियमांचा भंग झालाय का? नियम डावलुन निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांनी उद्घाटन केले का?, याचा खुलासा मागवला आहे.

पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील नेते, पक्ष जय्यत तयारी करत असल्याचं चित्र आहे, अशातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून नियमांचा भंग केल्याचं बोललं जात आहे, याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे खुलासा मागवला आहे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहिता भंगाचा पश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडुन निवडणुक आयोगाच्या नियमांचा भंग झालाय का? नियम डावलुन निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांनी  (Ajit Pawar) उद्घाटन केले का?, याचा खुलासा मागवला आहे. ⁠पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील गुरुवारच्या दौऱ्यातील ही घटना आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात ⁠इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन अर्थात, ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यासाठी हा प्रचार रथ तयार करण्यात आला होता.

या रथाचे उद्घाटन तहसीलदार ज्योती देवरे यांनी अजित पवार  (Ajit Pawar) यांच्या हस्ते या रथाचा शुभारंभ करून घेतल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तहलसीदार ज्योती देवरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाचे कार्यक्रम कसे घ्यावेत, याचे नियम निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार, निवडणूक आयोगाचे कार्यक्रम मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा ठराविक राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेऊ नयेत असा नियम आहे. मात्र, निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मतदान यंत्र हाताळणी व प्रशिक्षण कार्यक्रम जनजागृती रथाचे उदघाटन केले आहे.

नियम काय सांगतात?

- मतदान जनजागृती तसेच निवडणूक आयोगाच्या संदर्भातील कार्यक्रम कसे घ्यावेत, या संदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली आहेत.
 
- निवडणूक आयोगाचे कार्यक्रम हे सरकारचे मंत्री किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधीच्या उपस्थितीत न घेता सर्वपक्षीय प्रतिनिधींना निमंत्रित करून निवडणूक आयोगाच्या अधिनिस्त असणाऱ्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत किंवा हस्ते करण्याचे संकेत आहेत.

अशातच, खेड-आळंदी मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीमध्ये मतदान यंत्र जनजागृती रथाचे उ‌द्घाटन केले. अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यात हा कार्यक्रम नव्हता, अशी माहिती देखील समोर आली आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget