पुण्यातून EVM बाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, केंद्र सरकारला नोटीस
Pune News : इलोक्ट्रिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमबाबत पुण्यातून सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) याचिका दाखल करण्यात आली आहे.
Pune News : इलोक्ट्रिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमबाबत पुण्यातून सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) याचिका दाखल करण्यात आली आहे. ईव्हीएम (EVM) मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांनी म्हटलेय. सुप्रीम कोर्टानं (Supreme Court of India) ही याचिका स्वीकारली असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. या संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
पुण्यातील काँग्रेसचे नेते, प्रदेश सरचिटनीस अॅढ अभय छाजेडा आणि प्रदेश कार्यकरणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड(Dhananjaya Chandrachud), न्या. जे बी पारडीवाला, न्या मनोज मिश्रा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
छाजेड आणि अय्यर यांच्या वतीने अभय अनल अंतुरकर, सुरभी कपूर आणि असीम सरोदे हे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आज दुपारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. याबाबत छाडेज म्हणाले की, मतदानासाठी वापरल्या जाणार्या ईव्हीएम मशीनमध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लिप येतात,त्यावर प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी. अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज याबाबत सुनवणी होणार आहे.
दरम्यान, कसबा विधनसभा पोटनिवडणीदरम्यान काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली होती. पण ती निवडणूक आयोगानं फेटाळली. निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाची तारीख, वेळेसह स्लिप छापून मिळावी, अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टात धाव घेतली, असे छाजेड यांनी सांगितलं.
ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती. त्यावेळी आरोपींनी संधी साधली आणि ईव्हीएन मशीनचं कंट्रोल युनिट लंपास केलं.
आणखी वाचा :
EVM Machine Theft : मोठी बातमी! तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिट लंपास