Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर; पाच मानाचा गणपतीचं घेणार दर्शन
Eknath Shinde Pune Visit Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांना भेट देणार आहे.
LIVE

Background
मानाचा पहिला कसबा गणपतीची मुख्यमंत्र्यांची केली आरती
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली. यावेळी अनेक शिवसेनेचा कार्यकर्त्ये उपस्थित होते. भरपावसात अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी केली दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
एकनाथ शिंदेंनी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत होते. भाविकांनी आरतीसाठी गर्दी केली होती. त्याचवेळी पुण्यात वरुणराजाने देखील हजेरी लावली.
मुख्यंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनामुळे पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुख्यमंत्री पुण्यातील तब्बल 12 गणेश मंडळांना भेट देणार आहेत . त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक त्यांच्या ताफ्यासाठी अडवण्यात आली आहे. त्यामुळे या ताफ्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

